Join us

दिवाळीपूर्वी शेअर बाजारातील तेजीला ब्रेक, सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह उघडले; Midcap स्टॉक्स आपटले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 9:58 AM

Stock Market Opening On 18 October 2024: आठवड्याच्या कामकाजाच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजारात घसरणीसह व्यवहाराला सुरुवात झाली.

Stock Market Opening On 18 October 2024: आठवड्याच्या कामकाजाच्या अखेरच्या दिवशी शेअर बाजारात व्यवहाराला घसरणीसह सुरुवात झाली. बीएसई सेन्सेक्स २७६ अंकांनी तर निफ्टी ९३ अंकांनी घसरला. आयटी ऑटो शेअर्स घसरणीसह उघडले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही घसरण दिसून आली. 

बाजार घसरणीसह उघडल्यानंतर नफावसुलीमुळे घसरण वाढली. निफ्टी मिडकॅप निर्देशांक ८०० अंकांच्या घसरणीसह व्यवहार करत होता. बाजार उघडल्यानंतर काही वेळात सेन्सेक्स ५६२ तर निफ्टी १६८ अंकांनी घसरला. बाजारातील या कमकुवतपणामुळे India Vix ३.५१ टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे.

सेन्सेक्सच्या ३० शेअर्सपैकी केवळ ५ शेअर्स तेजीत आहेत, तर २५ शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. निफ्टीच्या ५० पैकी केवळ ७ शेअर्स तेजीसह उघडले, तर ४३ शेअर्स घसरणीसह व्यवहार करत होते. अॅक्सिस बँक २.७५ टक्के, आयशर मोटर्स २.०८ टक्के, विप्रो १.७९ टक्के, टीसीएस ०.५९ टक्के, भारती एअरटेल ०.०८ टक्के, आयसीआयसीआय बँक ०.०५४ टक्क्यांनी वधारले. श्रीराम फायनान्स, इन्फोसिस, मारुती, टायटन, बजाज ऑटो, महिंद्रा अँड महिंद्रा, बीपीसीएल, बीईएल, अदानी एंटरप्रायझेस या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

सर्वच क्षेत्रात घसरण

आजच्या कामकाजादरम्यान सर्वच क्षेत्रात घसरण झाली. बँकिंग, ऑटो, आयटी, एनर्जी, एफएमसीजी, इन्फ्रा, फार्मा, हेल्थकेअर, कन्झ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे.

गुंतवणूकदारांचं ५ लाख कोटींचे नुकसान

मोठ्या घसरणीसह शेअर बाजार उघडल्यानं गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं आहे. बीएसईवर लिस्टेड शेअर्सचं बाजार भांडवल घसरून ४५२ लाख कोटी रुपयांवर आलंय, जे मागील सत्रात ४५७ लाख कोटी रुपयांच्या जवळपास होतं. आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचं पाच लाख कोटी रुपयांचे नुकसान झालं आहे.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक