मुंबई : अमेरिकन टॅरिफवर अमेरिका आणि जपान यांच्यात वाटाघाटी सुरू झाल्या असून, यात यश मिळण्याची शक्यता वाढल्याने, तसेच विदेशी गुंतवणूकदार पुन्हा एकदा भारतातील शेअर बाजारात परतत असल्याचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारावर होत आहे.
गुरुवारी सलग चौथ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात दोन टक्क्यांनी वाढ होत सेन्सेक्स ७८ हजारांवर पोहोचला. यामुळे गुंतवणूकदार आणखी श्रीमंत झाले आहेत.
केवळ चार दिवसांमध्येच सेन्सेक्स ४,७०६ अंकांनी म्हणजेच ६.३७ टक्क्यांनी वाढला असून, निफ्टी १,४५२.५ अंकांनी म्हणजेच ६.४८ अंकांनी वाढला आहे.
सेन्सेक्स १,५०८.९१ अंकांनी वाढून ७८,५५३.२० वर स्थिरावला; तर निफ्टी ४१४.४५ अंकांनी वाढून २३,८५१.६५ वर पोहोचला आहे.
शेअर बाजार का वाढला?
जागतिक बाजारात फार काही सकारात्मक नसतानाही भारतीय गुंतवणूकदारांच्या सकारात्मकेमुळे बाजार वाढला.
कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली; वाटाघाटींमधून सकारात्मक निकालांची अपेक्षा; देशातील महागाई कमी झाली.
जागतिक बाजारात काय?
दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक, टोकियोचा निक्केई २२५, शांघाय एसएसई कंपोझिट निर्देशांक आणि हाँगकाँगचा हँग सेंग वाढीसह बंद झाले. युरोपीय बाजार नकारात्मक होते. अमेरिकन बाजार घसरले होते.