Share Market : १० दिवसांच्या सततच्या घसरणीनंतर आज गुंतवणूकदारांच्या जीवात जीव आला असेल. बुधवारी, सेन्सेक्स ८७० अंकांनी वाढून ७३,८६० वर व्यवहार करत होता. तर निफ्टी २८८ अंकांच्या वाढीसह २२,३७० च्या पातळीवर व्यवहार करत होता. टाटा स्टील, एमअँडएम, एचसीएल टेक्नॉलॉजीज, टेक महिंद्रा, अदानी पोर्ट्स, टाटा मोटर्स, पॉवर ग्रिड, एनटीपीसी, इन्फोसिस, टीसीएस आणि भारती एअरटेल या सर्व शेअर्समध्ये वाढ झाली. शेअर बाजारातील वाढीमागे ५ कारणे समोर आली आहेत.
बाजारात आज चौफेर खरेदी दिसून आली. लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप समभागांमध्येही चांगली वाढ दिसून आली. बाजारातील नेत्रदीपक वाढीमुळे आज गुंतवणूकदारांनी एका दिवसात सुमारे ८ लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे. खरंतर, काल बाजार बंद झाला तेव्हा BSE वर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप ३.८५ लाख कोटी रुपये होते, जे आज ३.९३ लाख कोटी रुपये झाले आहे.
शॉर्ट कव्हरींग
बाजारातील जाणकारांच्या मते, १९ सत्रांच्या दुष्काळानंतर बाजार तेजीत आहे. या कालावधीत गुंतवणूकदारांनी, विशेषत: परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर्समध्ये मोठ्या शॉर्ट पोझिशन्स जमा केल्या होत्या. आता ते त्यांची काही पॉझिशन्स कव्हर करत आहेत. त्यामुळे आजच्या वाढीमागे शॉर्ट कव्हरिंग हे एक कारण असू शकते.
डॉलरमध्ये घसरण
अमेरिकन डॉलर ३ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला आहे. डॉलरच्या घसरणीमुळे FII द्वारे शॉर्ट कव्हरिंग होऊ शकते. कारण अमेरिकन चलन डिसेंबर २०२४ पासून सर्वात खालच्या पातळीवर घसरले आहे. यूएस डॉलर निर्देशांक आज लाल रंगात व्यवहार करत आहे. तो १०५.५० च्या जवळ आला आहे. त्यामुळे एफआयआय अमेरिकन चलन बाजारात नफा बुक करताना दिसत आहेत.
यूएस बाँडचे उत्पन्न घसरले
तज्ञांच्या मते, यूएस डॉलरमध्ये नफा बुकिंगच्या ट्रिगरनंतर अलीकडील सत्रांमध्ये यूएस ट्रेझरी उत्पन्नात घट झाली आहे. हे देखील भारतीय बाजारपेठेत शॉर्ट कव्हरिंगचे कारण असू शकते.
अमेरिकेत महागाईची भीती
टॅरिफ वॉरमुळे अमेरिकेत महागाईची नवी भीती निर्माण झाली आहे. यामुळे फेड कठोर भूमिका घेऊ शकते. ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा हा दुष्परिणाम असेल.
यूएस स्टॉक मार्केट
शेअर बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळू शकते. ट्रम्प यांना त्यांच्या धोरणांवर पुनर्विचार करण्यास भाग पाडण्यासाठी मार्केट क्रॅश देखील होऊ शकते.