Stock Market : गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजाराचे वारू चौफेर उधळल्याचे पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस शेअर बाजार विक्रमी पातळी गाठत आहे. आज ऐतिहासिक उच्चांक गाठल्यानंतर भारतीय शेअर बाजार वरच्या पातळीच्या किंचित खाली बंद झाला. मागील आठवड्यात यूएस फेडरल बँकेने व्याजदर कपातीची घोषणा केली होती. पाठोपाठ चीननेही अर्थव्यस्थेला चालना देण्यासाठी पाऊल उचललं आहे. या सर्वांचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारात पाहायला मिळत आहे. सुरुवातील आयटी क्षेत्रातील शेअर्स घसरले असले तरी इतर क्षेत्रातील चांगल्या कामगिरीमुळे बाजारात नवीन विक्रम प्रस्थापित झाला आहे.
आज शेअर बाजाराच्या बंदमध्ये BSE सेन्सेक्स केवळ १४.५७ अंकांनी घसरला आणि ८४,९१४.०४ च्या पातळीवर बंद झाला. तर NSE निफ्टी १.३५ अंकांनी वाढून २५,९४०.४० वर बंद झाला. बाजारातील ही स्थिती देशांतर्गत शेअर मार्केटची ताकद दाखवत असून शेअर बाजारासाठी हा सुवर्णकाळ आहे.
शेअर बाजारात आज विक्रमी उच्चांक
दुपारी 3 वाजता भारतीय शेअर बाजाराने ऐतिहासिक विक्रम केला. निफ्टीने पहिल्यांदाच २६,००० चा टप्पा ओलांडला असून निफ्टीने ३७ ट्रेडिंग सत्रांमध्ये ही आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. या कालावधीत तो २५,००० ते २६,००० पर्यंत पोहोचला आहे. यामध्ये निफ्टीने २६,०११.५५ ही विक्रमी पातळी गाठली, तर निफ्टी बँकेनेही विक्रमी उच्चांक गाठला आहे. दुपारी 3 वाजता ही पातळी दिसून आली आणि सेन्सेक्सही ऑलटाईम हायवर पोहचले होते.
BSE सेन्सेक्स शेअर्सची स्थिती काय?
सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी १४ शेअर्समध्ये वाढ तर १६ शेअर्समध्ये घट पाहायला मिळाली. बीएसईचे बाजार भांडवल ४७६.०१ लाख कोटी रुपयांवर आले आहे. वास्तविक, त्याच्या पातळीत फारसा बदल दिसत नाही. कारण तो काल ४७६.१७ लाख कोटी रुपयांची बंद पातळीला पोहचला होता.
एस्ट्राजेनेका फार्मा के शेयर में 12 फीसदी की जबरदस्त उछाल
AstraZeneca फार्माच्या शेअर्समध्ये आज १२ टक्क्यांची दमदार वाढ दिसून आली. तो ११.२३ टक्क्यांनी वाढून ७५६० रुपयांच्या पातळीवर दिसत आहे. कंपनीला भारतात कॅन्सरचे औषध सुरू करण्यास मंजुरी मिळाली असून या वृत्तानंतर त्यात मोठी उसळी पाहायला मिळाली.
मेटल शेअर्समध्ये तेजी
शेजारी राष्ट्र चीनने रियल इस्टेट क्षेत्राला चालना देण्यासाठी व्याजदर कपात आणि आर्थिक पॅकेज घोषित केले. या निर्णयाचा सकारात्मक परिणाम भारतीय शेअर बाजारात पाहायला मिळाला. भारतात मेटल्स शेअर्समध्ये अचानक उसळी पाहायला मिळाली. टाटा स्टील, एनएमडीसी, हिंदाल्को या शेअर्समध्ये मजबूत वाढ दिसून आली.