Stock Market Record: गुरुवारी शेअर बाजाराची सुरुवात फ्लॅट झाली, पण असं असलं तरी लगेचच त्यानं विक्रमी पातळी गाठली. बीएसई सेन्सेक्सनं पहिल्यांदाच ८५३०० ची पातळी ओलांडली आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २६,०५६ वर आला असून हा त्याचा आतापर्यंतचा उच्चांकी स्तर आहे. बीएसई सेन्सेक्स ८५,३७२.१७ अंकांच्या ऐतिहासिक पातळीवर पोहोचला. आज आयटी शेअर्समध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे.
बीएसई सेन्सेक्स प्री-ओपनिंगमध्ये जवळपास १६० अंकांनी वधारला होता, पण तो उघडेपर्यंत त्यात घसरण झाली. त्याचवेळी प्री-ओपनिंगमध्ये निफ्टीमध्ये तेजी दिसून आली आणि ओपनिंगनंतरही त्यात वाढ कायम राहिली.
या शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी / घसरण
आज सेन्सेक्सच्या प्रमुख ३० शेअर्सपैकी १७ शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर १३ शेअर्समध्ये घसरण दिसून आली. यापैकी सर्वाधिक तेजी मारुतीच्या शेअरमध्ये झाली. यानंतर टाटा मोटर्स, इन्फोसिस, नेस्ले, एचसीएल टेक, एअरटेल, टीसीएस, आयटीसी, सन फार्म या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी होती. तर इंडसइंड बँक, बाजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, रिलायन्स, टाटा स्टील, एचडीएफसी, अदानी पोर्ट्समध्ये घसरण दिसून आली.