Lokmat Money >शेअर बाजार > रिलायन्स इंडस्ट्रीजच्या तेजीनं शेअर बाजार सावरला, परंतु गुंतवणूकदारांचे ₹१५,००० कोटी बुडाले

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या तेजीनं शेअर बाजार सावरला, परंतु गुंतवणूकदारांचे ₹१५,००० कोटी बुडाले

Share Market Closing: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समधील वाढीमुळे, दोन्ही बेंचमार्क निर्देशांक १० जुलै रोजी किंचित वाढीसह बंद झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 04:14 PM2023-07-10T16:14:40+5:302023-07-10T16:15:07+5:30

Share Market Closing: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समधील वाढीमुळे, दोन्ही बेंचमार्क निर्देशांक १० जुलै रोजी किंचित वाढीसह बंद झाले.

Stock market recovered on Reliance Industries rally but investors lost rs 15000 crore closing bell | रिलायन्स इंडस्ट्रीजच्या तेजीनं शेअर बाजार सावरला, परंतु गुंतवणूकदारांचे ₹१५,००० कोटी बुडाले

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या तेजीनं शेअर बाजार सावरला, परंतु गुंतवणूकदारांचे ₹१५,००० कोटी बुडाले

Share Market Closing: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समधील वाढीमुळे, दोन्ही बेंचमार्क निर्देशांक 10 जुलै रोजी किंचित वाढीसह बंद झाले. सेन्सेक्समध्ये 63.72 अंकांची वाढ होऊ तो 65,344.17 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 24.10 अंकांच्या वाढीसह 19,355.90 वर बंद झाला. मात्र, ब्रॉडर मार्केटमध्ये घसरण दिसून आली. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 0.46 टक्क्यांनी घसरून बंद झाला आणि स्मॉलकॅप निर्देशांक 0.26 टक्क्यांनी घसरला. 

कामकाजादरम्यान सर्वात मोठी घसरण आयटी, युटिलिटी, कंझ्युमर ड्युरेबल्स, पॉवर आणि रियल्टीच्या शेअर्समध्ये दिसून आली. मात्र, दुसरीकडे मेटल आणि एनर्जी कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजीचा दिसून येत होती. या अस्थिर परिस्थितीत आज शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 15,000 कोटी रुपयांचं नुकसान झालं.

15 हजार कोटी बुडाले
बीएसईवरील लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप 10 जुलै रोजी 299.63 लाख कोटी रुपयांवर घसरलं. आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच शुक्रवारी 7 जुलै रोजी ते 299.78 लाख कोटी रुपये होते. अशाप्रकारे, बीएसईमध्ये लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप आज सुमारे 15 हजार कोटी रुपयांनी कमी झाले आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर आज गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 15,000 कोटी रुपयांची घट झाली आहे.

या पाच शेअर्समध्ये तेजी
या घसरणीदरम्यान सेन्सेक्समधील 30 पैकी केवळ 9 शेअर्स आज तेजीसह बंद झाले. यामध्येही रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरनं सर्वाधिक 3.78 टक्क्यांची वाढ नोंदवली. यानंतर, टाटा स्टील, भारती एअरटेल, सन फार्मा आणि इंडसइंड बँक यांचे शेअर्स सर्वाधिक वाढले.

Web Title: Stock market recovered on Reliance Industries rally but investors lost rs 15000 crore closing bell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.