Lokmat Money >शेअर बाजार > सुरुवातीच्या घसरणीनंतर शेअर बाजारात रिकव्हरी, Adani च्या शेअर्सचं जबदरस्त पुनरागमन

सुरुवातीच्या घसरणीनंतर शेअर बाजारात रिकव्हरी, Adani च्या शेअर्सचं जबदरस्त पुनरागमन

सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच आणि हिंडेनबर्ग रिसर्चच्या अदानी समूहावरील रिपोर्टनंतर शेअर बाजारात मोठी घसरण होऊ शकते अशा शक्यता वर्तवल्या जात होत्या. परंतु कामाकाजादरम्यान शेअर बाजारात चांगली रिकव्हरी दिसून आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 04:16 PM2024-08-12T16:16:01+5:302024-08-12T16:16:10+5:30

सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच आणि हिंडेनबर्ग रिसर्चच्या अदानी समूहावरील रिपोर्टनंतर शेअर बाजारात मोठी घसरण होऊ शकते अशा शक्यता वर्तवल्या जात होत्या. परंतु कामाकाजादरम्यान शेअर बाजारात चांगली रिकव्हरी दिसून आली.

Stock market recovers after initial fall, Adani shares bounce back | सुरुवातीच्या घसरणीनंतर शेअर बाजारात रिकव्हरी, Adani च्या शेअर्सचं जबदरस्त पुनरागमन

सुरुवातीच्या घसरणीनंतर शेअर बाजारात रिकव्हरी, Adani च्या शेअर्सचं जबदरस्त पुनरागमन

सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच आणि हिंडेनबर्ग रिसर्चच्या अदानी समूहावरील रिपोर्टनंतर शेअर बाजारात मोठी घसरण होऊ शकते अशा शक्यता वर्तवल्या जात होत्या.  कामकाजादरम्यान पहिल्या ट्रेडिंग सेशनमध्ये अपेक्षित असलेलं वादळ बाजारानं सहज दूर केलं आणि बाजार बंद होताच सेन्सेक्स आणि निफ्टी अगदी किरकोळ घसरणीसह बंद झाले.

सेन्सेक्स-निफ्टी किरकोळ घसरणीसह बंद

सकाळी भारतीय शेअर बाजार ३७० आणि निफ्टी ४७ अंकांच्या घसरणीसह उघडला. सेन्सेक्स ४८० अंकांनी तर निफ्टी १५५ अंकांनी घसरला. पण त्यानंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदीचा कल दिसून आला आणि सेन्सेक्स ८२५ अंकांची उसळी ८००६० आणि निफ्टी २६० अंकांनी वधारून २४,४७२ वर पोहोचला. पण बाजार बंद होण्याआधीच नफावसुली झाली आणि दिवसभराच्या उच्चांकी पातळीवरून शेअर बाजार खाली आला. कामकाजाच्या अखेरिस सेन्सेक्स ५७ अंकांनी घसरून ७९,६४९ वर तर निफ्टी २० अंकांनी घसरून २४,३४७ अंकांवर बंद झाला.

या शेअर्समध्ये घसरण / तेजी

आजच्या व्यवहारात सेन्सेक्सच्या ३० पैकी १२ कंपन्यांचे शेअर्स वधारले आणि १८ घसरले. निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी २३ शेअर्स वधारले तर २७ घसरले. सर्वाधिक तेजी दिसून आलेल्या शेअर्समध्ये अॅक्सिस बँक १.८० टक्के, इन्फोसिस १.५१ टक्के, जेएसडब्ल्यू स्टील १.३४ टक्के, टाटा मोटर्स ०.७९ टक्के, एचडीएफसी बँक ०.७० टक्के, कोटक महिंद्रा बँक ०.३६ टक्के, मारुती सुझुकी ०.३२ टक्के, टाटा स्टील ०.२३ टक्के, एशियन पेंट्स ०.१९ टक्के, आयसीआयसीआय बँक ०.०८ टक्के, इंडसइंड बँक ०.०७ टक्के यांचा समावेश होता. तर अदानी पोर्ट्स २.०२ टक्के, एनटीपीसी २.०२ टक्के, पॉवर ग्रिड १.५० टक्के, एसबीआय १.३६ टक्के, नेस्ले १.१५ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा १.१० टक्क्यांनी घसरून बंद झाले.

Web Title: Stock market recovers after initial fall, Adani shares bounce back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.