Stock Markets Today: रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणापूर्वी शुक्रवारी देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात किरकोळ तेजीसह झाली. सेन्सेक्स ६१ अंकांनी वधारून ७८,११९ वर उघडला. निफ्टी ४६ अंकांनी वधारून २३,६४९ वर आणि बँक निफ्टी १०२ अंकांनी वधारून ५०,४८४ वर उघडला. सेन्सेक्स एकदा २०० अंकांनी वधारला होता, पण नंतर तो जवळपास १०० अंकांनी घसरल्याचं दिसून आलं. चलन बाजारात रुपया ११ पैशांनी मजबूत होऊन ८७.४५ डॉलर वर पोहोचला.
निफ्टीवर भारती एअरटेल, ब्रिटानिया, टाटा स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, जेएसडब्ल्यू स्टील यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले. तर पॉवर ग्रीड, एसबीआय, ओएनजीसी, आयटीसी, टीसीएसमध्ये घसरण झाली.
रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर संजय मल्होत्रा आज सकाळी १० वाजता व्याजदरात कपातीची घोषणा करू शकतात. काल विकली एक्सपायरीच्या दिवशी एफआयआयनं कॅश, इंडेक्स आणि स्टॉक फ्युचर्स मिळून ११२०० कोटी रुपयांची मोठी विक्री केली, तर देशांतर्गत फंडांनी २७०० कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली.
जागतिक बाजारातील अपडेटदमदार सुरुवातीनंतर अमेरिकी बाजारात अस्थिरतेचे वातावरण होतं. डाऊ १२५ अंकांनी घसरला, तर नॅसडॅक १०० अंकांनी वधारून सलग तिसऱ्या दिवशी दिवसभराच्या उच्चांकी पातळीवर बंद झाला. गिफ्ट निफ्टी २३,७०० च्या खाली फ्लॅट बंद झाला. जानेवारीच्या रोजगाराच्या आकडेवारीपूर्वी डाऊ फ्युचर्स मंदावले होते आणि निक्केई १०० अंकांनी घसरला होता.
लाइफ हायवर प्रॉफिट बुकिंगमुळे सोनं १० डॉलरघसरून २८८० डॉलरवर तर चांदी ३३ डॉलरच्या खाली आली. देशांतर्गत सराफा बाजारात सोनं १०० रुपयांनी घसरून ८४,५०० रुपयांवर तर चांदी ४०० रुपयांनी घसरून ९५,५०० रुपयांवर आली. कच्च्या तेलाचा भाव ७४ डॉलरच्या जवळपास घसरला होता.