Lokmat Money >शेअर बाजार > 105 रुपयांचा शेअर रॉकेट बनला, 400% परतावा देत 512 वर पोहोचला; तज्ज्ञांनी व्यक्त केलाय मोठा अंदाज!

105 रुपयांचा शेअर रॉकेट बनला, 400% परतावा देत 512 वर पोहोचला; तज्ज्ञांनी व्यक्त केलाय मोठा अंदाज!

बुधवारी सकाळी कंपनीचा शेअर 6 टक्क्यांहून अधिक आघाडी घेण्यात यशस्वी ठरले होते. मात्र, सायंकाळ होता होता कंपनीच्या शेअरचा भाव 4.67 टक्क्यांनी घसरून 512 रुपयांवर बंद झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 07:23 PM2023-01-25T19:23:45+5:302023-01-25T19:24:06+5:30

बुधवारी सकाळी कंपनीचा शेअर 6 टक्क्यांहून अधिक आघाडी घेण्यात यशस्वी ठरले होते. मात्र, सायंकाळ होता होता कंपनीच्या शेअरचा भाव 4.67 टक्क्यांनी घसरून 512 रुपयांवर बंद झाला.

stock market Rs 105 sharda cropchem share returning 400 percent Experts have expressed a big estimate | 105 रुपयांचा शेअर रॉकेट बनला, 400% परतावा देत 512 वर पोहोचला; तज्ज्ञांनी व्यक्त केलाय मोठा अंदाज!

105 रुपयांचा शेअर रॉकेट बनला, 400% परतावा देत 512 वर पोहोचला; तज्ज्ञांनी व्यक्त केलाय मोठा अंदाज!

शेअर बाजारात गेल्या काही वर्षांमध्ये ज्या कंपन्यांच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा दिला आहे, त्यांत शारदा क्रॉपकेमचाही (Sharda Cropchem) समावेश आहे. कोरोना काळानंतर या कंपनीच्या शेअरने रॉकेट स्पीड घेतला आहे. एप्रिल 2022 पासून ते आतापर्यंत कंपनीच्या शेअरचा भाव 105 रुपयांवरून 512 रुपयांवर पोहोचला आहे. गुंतवणूकदारांसाठी सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे, ब्रोकरेज आनंद राठी यांनी या मल्टीबॅगर स्टॉकला ‘बाय’ टॅग दिले आहे.

ब्रोकरेज आनंद राठी यांच्या रिपोर्टमध्ये Sharda Cropchem च्या कामगिरीसंदर्भात सांगण्यात आले आहे की, गेल्या काही दिवसांपासून हा स्टॉक विशेष दबावात राहिला आहे. आम्ही हा स्टॉक येणाऱ्या काही दिवसांत 700 रुपये प्रति शेअरवर पोहोचताना पाहत आहोत. डेली चार्टवर हा शेअर 500 ते 510 रुपये प्रति शेअरच्या जवळपास दिसत आहे.

बुधवारी सकाळी कंपनीचा शेअर 6 टक्क्यांहून अधिक आघाडी घेण्यात यशस्वी ठरले होते. मात्र, सायंकाळ होता होता कंपनीच्या शेअरचा भाव 4.67 टक्क्यांनी घसरून 512 रुपयांवर बंद झाला. गेल्या एक महिन्यात कंपनीच्या शेअरचा भाव 13 टक्क्यांहून अधिकने वधारला आहे. मात्र, या तेजीनंतरही कंपनीच्या शेअरवर 6 महिन्यांपूर्वी गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार अद्यापही नुकसान सहन करत आहेत. या काळात शारदा क्रॉपकेमचा शेअर 3.26 टक्क्यांहून अधिक घसरला आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

 

Web Title: stock market Rs 105 sharda cropchem share returning 400 percent Experts have expressed a big estimate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.