शेअर बाजारात किशोर बियानी यांच्या फ्युचर समूहाचा भाग असलेल्या फ्युचर मार्केट जनरलचा शेअर गेल्या शुक्रवारी 2% पर्यंत घसरून 12.47 रुपयांवर बंद झाला. कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या अनेक कामकाजाच्या दिवसांपासून अप्पर सर्किट लागत होते. विसेष म्हणजे, या शेअरमध्ये गेल्या महिनाभरात 80% ची तेजी दिसून आली आहे.
याकालावधीत हा शेअर 6.87 रुपयांनी (16 ऑगस्ट 2024) वधारून 12.47 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या सहा महिन्यांत या शेअरने 111% एवढा बंपर परतावा दिला आहे. मात्र गेल्या 5 दिवसांचा विचार करता फ्युचर समूहाचा हा शेअर 8% पर्यंत घसरला आहे. तसेच, या शेअरने दीर्घ काळात 93% एवढे जबरदस्त नुकसान केले आहे.
असा आहे सेअरचा परफॉर्मन्स -
फ्युचर मार्केट जनरलचा शेअर या वर्षात आतापर्यंत 106% ने वाधारला असून एका वर्षात 103% ने वधारला आहे. या कालावधीत हा शेअर 6 रुपयांवरून सध्याच्या किमतीपर्यंत पोहोचला आहे. मात्र, दीर्घकाळाचा विचार करता या शेअरने जबरदस्त नुकसान केल आहे.
हा शेअर 2019 पासून आतापर्यंत 70% पर्यंत घसरला आहे. 25 ऑक्टोबर 2019 मध्ये या शेअरची किंमत 40 रुपये होती. हा शेअर 2017 पासून आतापर्यंत 93% पर्यंत घसरला आहे. या कालावधीत या शेअरची किंमत 184 रुपयांवरून (8 सप्टेंबर 2017) घसरून 12.41 रुपयांपर्यंत आली आहे. सध्या कंपनीचे मार्केट कॅप जवळपास 71.76 कोटी रुपये एवढे आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)