Join us  

Share Market Today : शेअर बाजाराची अजब सुरुवात; Sensex २२३ अंकांनी घसरून तर, निफ्टी ३६ अंकांनी वधारुन सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2024 10:02 AM

Stock Market Opening: देशांतर्गत शेअर बाजाराच्या कामकाजाची सुरुवात आज घसरणीसह पाहायला मिळाली आहे. शेअर बाजारातील कामकाजाच्या सुरुवातीला आज संमिश्र व्यवहार पाहायला मिळाला.

Stock Market Opening: देशांतर्गत शेअर बाजाराच्या कामकाजाची सुरुवात आज घसरणीसह पाहायला मिळाली आहे. शेअर बाजारातील कामकाजाच्या सुरुवातीला आज संमिश्र व्यवहार पाहायला मिळत असून बीएसई सेन्सेक्स घसरणीसह खुला झाला. तर एनएसई निफ्टीमध्ये पुन्हा तेजी दिसून आली. कामकाजाच्या सुरुवातीला बीएसई सेन्सेक्स २२३.४४ अंकांनी म्हणजेच ०.२८ टक्क्यांनी घसरला. तर निफ्टी ३६.४५ अंकांनी म्हणजेच ०.१५ टक्क्यांच्या वाढीसह २४,८३२ वर व्यवहार करत होता.

सेन्सेक्सच्या १७ शेअर्समध्ये तेजी दिसून येत असून १३ शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे. महिंद्रा अँड महिंद्रा, एचयूएल, भारती एअरटेल आणि अॅक्सिस बँकेच्या शेअर्समध्ये तेजी असून एसबीआय, एल अँड टी आणि अल्ट्राटेक सिमेंटमध्ये घसरण दिसून येत आहे.

बँक निफ्टी घसरला

मिडकॅपची सुरुवात ३०० अंकांच्या जोरदार घसरणीसह झाली असून बाजार उघडताच निफ्टीही रेड झोनमध्ये आला. बँक निफ्टीनंही सुरुवातीची तेजी गमावली असून तोही रेड झोनमध्ये आला.

प्री ओपनिंगची स्थिती काय?

शेअर बाजाराच्या प्री-ओपनिंगमध्ये बीएसई सेन्सेक्स १६०.६३ अंकांवर म्हणजेच ८०,८८९ च्या पातळीवर व्यवहार करत होता. एनएसईचा निफ्टी ९६.६० अंकांच्या वाढीसह २४,६९७ च्या पातळीवर व्यवहार करत होता.

टॅग्स :शेअर बाजार