Lokmat Money >शेअर बाजार > Stock Market: सेन्सेक्सची गटांगळी, या कारणांमुळे बाजारात मोठी घसरण

Stock Market: सेन्सेक्सची गटांगळी, या कारणांमुळे बाजारात मोठी घसरण

Stock Market: जगभरातील अर्थव्यवस्थांमध्ये आलेली मरगळ आणि केंद्रीय बँका आक्रमकपणे वाढवत असलेल्या व्याजदर यामुळे मुंबई शेअर बाजारात गुरुवारी घसरगुंडी पहायला मिळाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 06:14 AM2022-09-02T06:14:09+5:302022-09-02T06:14:34+5:30

Stock Market: जगभरातील अर्थव्यवस्थांमध्ये आलेली मरगळ आणि केंद्रीय बँका आक्रमकपणे वाढवत असलेल्या व्याजदर यामुळे मुंबई शेअर बाजारात गुरुवारी घसरगुंडी पहायला मिळाली.

Stock Market: Sensex group, due to these reasons the market fell | Stock Market: सेन्सेक्सची गटांगळी, या कारणांमुळे बाजारात मोठी घसरण

Stock Market: सेन्सेक्सची गटांगळी, या कारणांमुळे बाजारात मोठी घसरण

मुंबई - जगभरातील अर्थव्यवस्थांमध्ये आलेली मरगळ आणि केंद्रीय बँका आक्रमकपणे वाढवत असलेल्या व्याजदर यामुळे मुंबई शेअर बाजारात गुरुवारी घसरगुंडी पहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ७७० अंकांनी, तर निफ्टी २१६ अंकांनी कोसळून बंद झाला.

डिझेल व विमान इंधनाच्या निर्यातीवर कर  वाढवल्याने व देशात तयार झालेल्या कच्च्या  तेलावर शुल्क वाढवल्याने रिलायन्स  इंडस्ट्रीज समभाग (२.९९%)  मोठ्या प्रमाणात  कोसळला.

फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढीसाठी आक्रमक धोरण आणि चीनमध्ये आर्थिक मंदीबाबत चिंता यामुळे जगभरातील शेअर बाजार ढेपाळले. त्याचवेळी महागाईचे आकडेही उच्चांकी स्तरावर असल्याने चिंता वाढली. त्याचा परिणाम म्हणून बाजारात घसरण झाली.

कच्चे तेल उतरले
n कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने चढउतार सुरू आहे. गुरुवारी जगभरातील अर्थव्यवस्था मंदावल्याचे समोर आल्यानंतर तत्काळ त्याचा परिणाम तेलाच्या किमतीवर दिसून आला. 
n त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती २ टक्क्यांनी कमी होत कच्चे तेल ९३.७२ डॉलर प्रति बॅरलवर आले. 
n विदेशी गुंतवणूकदारांनी मंगळवारी भारतीय बाजारातून ४,१६५ कोटींच्या किमतीचे समभाग खरेदी केले आहेत.

Web Title: Stock Market: Sensex group, due to these reasons the market fell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.