Join us  

तीन दिवसांनंतर शेअर बाजारात चमक, गुंतवणूकदारांना ₹१.५ लाख कोटींपेक्षा अधिक फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 4:34 PM

गेल्या 3 दिवसांपासून शेअर बाजारात सुरू असलेली घसरण आज 17 ऑक्टोबर रोजी थांबली.

Share Market Update: गेल्या 3 दिवसांपासून शेअर बाजारात सुरू असलेली घसरण आज 17 ऑक्टोबर रोजी थांबली. सकारात्मक जागतिक संकेतांमुळे बाजारात चौफेर खरेदी दिसून आली. सेन्सेक्स 261 अंकांच्या वाढीसह बंद झाला. निफ्टीनं पुन्हा 19,800 ची पातळी ओलांडली. त्यामुळे आज गुंतवणूकदारांना दीड लाख कोटींहून अधिक नफा झाला आहे. बीएसई मिडकॅप निर्देशांक 0.39 टक्क्यांनी वाढला, तर स्मॉलकॅप निर्देशांकानं 0.70 टक्क्यांच्या वाढीसह सर्वोत्तम कामगिरी केली.कामकाजाच्या अखेरीस बीएसई सेन्सेक्स 261.16 अंकांनी किंवा 261.16% वाढून 66,428.09 वर बंद झाला. तर NSE चा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 79.75 अंकांच्या किंवा 0.40% च्या वाढीसह 19,811.50 वर बंद झाला.गुंतवणूकदारांची संपत्ती 1.56 लाख कोटींनी वाढलीबीएसई वर लिस्टेड कंपन्यांचं एकूण बाजार भांडवल 17 ऑक्टोबर रोजी वाढून 323.81 लाख कोटी रुपये झालं. जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे सोमवार, 16 ऑक्टोबर रोजी 322.25 लाख कोटी रुपये होते. अशा प्रकारे, बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप आज सुमारे 1.56 लाख कोटी रुपयांनी वाढलं. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालंतर गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.56 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढसेन्सेक्समधील 30 पैकी 22 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्येही पॉवर ग्रिडच्या शेअर्समध्ये सर्वाधिक 2.07 टक्के वाढ झाली. तर कोटक महिंद्रा बँक, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स आणि आयटीसीचे शेअर्स 0.99 टक्के ते 1.36 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.हे शेअर्स घसरलेसेन्सेक्समधील उर्वरित 8 शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. यामध्ये टाटा मोटर्सचे शेअर्स सर्वाधिक 1.49 टक्क्यांनी घसरले. याशिवाय लार्सन अँड टुब्रो, इंडसइंड बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) आणि जेएसडब्ल्यू स्टीलचे शेअर्स 0.22 टक्के ते 1.13 टक्क्यांपर्यंत घसरले.

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक