Lokmat Money >शेअर बाजार > ₹9 च्या शेअरची कमाल, सातत्यानं वाढतोय भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड, करतोय मालामाल!

₹9 च्या शेअरची कमाल, सातत्यानं वाढतोय भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड, करतोय मालामाल!

नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी (NBFC) सॉफ्टट्रॅक व्हेंचर इन्व्हेस्टमेंटच्या शेअर्सच्या बाबतीतही असेच काहीसे दिसून आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 07:23 PM2024-02-26T19:23:35+5:302024-02-26T19:23:52+5:30

नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी (NBFC) सॉफ्टट्रॅक व्हेंचर इन्व्हेस्टमेंटच्या शेअर्सच्या बाबतीतही असेच काहीसे दिसून आले आहे.

stock market softrak venture investment share surges 10 percent upper circuit investors cheers | ₹9 च्या शेअरची कमाल, सातत्यानं वाढतोय भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड, करतोय मालामाल!

₹9 च्या शेअरची कमाल, सातत्यानं वाढतोय भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड, करतोय मालामाल!

शेअर बाजारात अनेक गुंतवणूकदार पेनी स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणे पसंत करतात. खरे तर पेनी स्टॉक्समध्ये गुंतवणूक करणे अधिक जोखमीचे असले. मात्र, अशा शेअर्समध्ये अनेकदा अचानकपणे तेजी दिसून येते. नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी (NBFC) सॉफ्टट्रॅक व्हेंचर इन्व्हेस्टमेंटच्या शेअर्सच्या बाबतीतही असेच काहीसे दिसून आले आहे.

अशी आहे शेअरची स्थिती -
आठवड्याच्या पहिल्याच व्यवहाराच्या दिवशी अर्थात सोमवारी या शेअरला 10 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले आहे. 8.36 रुपये या गेल्या क्लोजिंगच्या तुलनेत हा शेअर 9.19 रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी 2 मार्चला या शेअरची किंमत 11.15 रुपयांवर पोहोचली होती आणि हा शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकही आहे. तसेच 4.04 रुपये हा या शेअरचा निचांक असून 31 मार्च 2023 रोजी शेअर या पातळीवर गेला होता.

या शेअरने एका आठवड्यात बीएसईच्या तुलनेत आपल्या गुंतवणूकदारांना 30 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. अशा प्रकारे दोन आठवड्यांचा परतावा 40 टक्के राहिला आहे. वर्षिक आधारावर हा स्टॉक 50 टक्क्यांनी वाढला आहे. शेअरहोल्डिंग पॅटर्नसंदर्भात बोलायचे झाल्यास, प्रमोटरचा वाटा शून्य आहे. अर्थात पब्लिक शेअरहोल्डिंग 100 टक्के एवढी आहे.

काय करते कंपनी? -
सॉफ्टट्रक व्हेंचर इन्व्हेस्टमेंटची स्थापना 1993 मध्ये झाली. कंपनी NBFC तसेच एका मुख्य IT व्यवसायाशी संबंधित आहे. कंपनीच्या वेबसाइटनुसार, मायक्रोसॉफ्ट एएसपी.नेट, जावा, जावा स्क्रिप्ट, पीएचपी, ओपन सोर्स, अँड्रॉइड आणि आयओएस ओएस, माय एसक्यूएल सारख्या मजबूत तंत्रज्ञानावर आधारित सॉफ्टवेअर सोल्यूशन्स प्रदान करते.
 

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: stock market softrak venture investment share surges 10 percent upper circuit investors cheers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.