Lokmat Money >शेअर बाजार > शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; TATA Motors मध्ये तेजी, टायटन कंपनीचे शेअर्स घसरले

शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; TATA Motors मध्ये तेजी, टायटन कंपनीचे शेअर्स घसरले

आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजाराच्या कामकाजाची सुरुवात फ्लॅट झाली.निफ्टीतील व्यवहार ६ अंकांच्या किरकोळ वाढीसह २४३२९ च्या पातळीवर सुरू झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 09:37 AM2024-07-08T09:37:50+5:302024-07-08T09:38:00+5:30

आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजाराच्या कामकाजाची सुरुवात फ्लॅट झाली.निफ्टीतील व्यवहार ६ अंकांच्या किरकोळ वाढीसह २४३२९ च्या पातळीवर सुरू झाले.

Stock market starts flat Bullish in TATA Motors shares of Titan Company down details | शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; TATA Motors मध्ये तेजी, टायटन कंपनीचे शेअर्स घसरले

शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; TATA Motors मध्ये तेजी, टायटन कंपनीचे शेअर्स घसरले

आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजाराच्या कामकाजाची सुरुवात फ्लॅट झाली.निफ्टीतील व्यवहार ६ अंकांच्या किरकोळ वाढीसह २४३२९ च्या पातळीवर सुरू झाले, तर सेन्सेक्स ८२ अंकांनी घसरून ७९९१५ च्या पातळीवर उघडला. बाजार उघडताच विक्रीचा दबाव दिसून येत असून, त्यात बँकिंग क्षेत्रात सर्वाधिक विक्रीचा दबाव दिसून आला. आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँकेसह लार्जकॅप बँकांच्या शेअरवर दबाव होता.

निफ्टी ५० मध्ये टाटा मोटर्स, ओएनजीसी, अपोलो हॉस्पिटल्स, एचडीएफसी लाईफ या कंपन्यांचे समभाग सर्वाधिक वधारले, तर टायटन कंपनी, श्रीराम फायनान्स, एशियन पेंट्स, डिव्हिस लॅब या शेअरमध्ये विक्रीचा दबाव दिसून येत आहे.

शुक्रवारी बेंचमार्क निर्देशांक किरकोळ वाढीसह बंद झाले. पण एकंदरीत शेवटचा आठवडा बाजारासाठी सकारात्मक होता. गेल्या महिन्यात ७ टक्क्यांच्या तेजीनंतर बाजार हाय लेव्हल झोनमध्ये कन्सोलिडेट करेल, असा विश्लेषकांचा अंदाज आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे रिटेल रिसर्च हेड सिद्धार्थ खेमका यांनी "आम्हाला या आठवड्यात स्टॉक स्पेसिफिक अॅक्शनची अपेक्षा आहे कारण बाजार आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीच्या कमाईपासून संकेत घेण्यास सुरुवात करू शकतो. मॅक्रो फ्रंटवर गुंतवणूकदारांचे लक्ष भारत, अमेरिका आणि चीननं जाहीर केलेल्या महागाईच्या आकडेवारीवर असेल," अशी प्रतिक्रिया दिली.

पुढील काही सत्रांमध्ये निफ्टीला २४४००-२४५०० च्या आसपास ब्रेकआऊट रेझिस्टन्सला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे नागराज शेट्टी यांनी निफ्टीला २४१७० च्या पातळीवर इमिजिएट सपोर्ट असल्याचं म्हटलं.

Web Title: Stock market starts flat Bullish in TATA Motors shares of Titan Company down details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.