Lokmat Money >शेअर बाजार > Share Market : शेअर बाजाराची धमाकेदार सुरुवात, सेन्सेक्स ७२२०० पार; निफ्टीही वधारला, Paytm आपटला

Share Market : शेअर बाजाराची धमाकेदार सुरुवात, सेन्सेक्स ७२२०० पार; निफ्टीही वधारला, Paytm आपटला

गुरुवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. अंतरिम अर्थसंकल्पानंतर शुक्रवारी शेअर बाजारात जोरदार सुरुवात झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 10:23 AM2024-02-02T10:23:06+5:302024-02-02T10:23:41+5:30

गुरुवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. अंतरिम अर्थसंकल्पानंतर शुक्रवारी शेअर बाजारात जोरदार सुरुवात झाली.

Stock market starts with a bang Sensex crosses 72200 Nifty also rose Paytm fell 20 percent | Share Market : शेअर बाजाराची धमाकेदार सुरुवात, सेन्सेक्स ७२२०० पार; निफ्टीही वधारला, Paytm आपटला

Share Market : शेअर बाजाराची धमाकेदार सुरुवात, सेन्सेक्स ७२२०० पार; निफ्टीही वधारला, Paytm आपटला

Budget Impact on Share Market LIVE: गुरुवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. अंतरिम अर्थसंकल्पानंतर शुक्रवारी शेअर बाजारात जोरदार सुरुवात झाली. बीएसई सेन्सेक्स 332 अंकांच्या उसळीसह 71977 वर उघडला. तर, एनएसई निफ्टी आठवड्याच्या शेवटच्या दिवसाच्या व्यवहारादरम्यान 115 अंकांच्या वाढीसह 21812 च्या पातळीवर उघडला. बाजार उघडल्यानंतर सहा मिनिटांनी सेन्सेक्स 803 अंकांच्या उसळीसह 72449 वर व्यवहार करत होता. निफ्टी 230 अंकांच्या उसळीसह 21927 वर पोहोचला होता. 

सकाळी साडेनऊच्या दरम्यान सेन्सेक्स 838 अंकांच्या उसळीसह 72483 वर पोहोचला. निफ्टी 246 अंकांच्या उसळीसह 21943 वर काम करत होता. सेन्सेक्समध्ये ॲक्सिस बँक वगळता सर्व समभाग ग्रीन झोनमध्ये आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज 2.50 टक्क्यांनी वाढून 2926.50 रुपयांवर व्यवहार करत आहेत. इन्फोसिस, आयसीआयसीआय बँकेचे शेअर्सही दोन टक्क्यांहून अधिक वाढले.

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात अदानी पोर्ट्स, बीपीसीएल, टायटन आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स टॉप गेनर्सच्या यादीत समाविष्ट होते. शुक्रवारी सुरुवातीच्या कामकाजादरम्यान सर्वाधिक नुकसान झालेल्यांच्या शेअर्सच्या यादीत आयशर मोटर्स, लार्सन अँड टुब्रो, पॉवर ग्रिड, मारुती सुझुकी, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि ब्रिटानिया या शेअर्सचा समावेश होता.

एनबीसीसी, कॅस्ट्रॉल इंडिया, इन्फिबीम, ॲबॉट, इंडियन ओव्हरसीज बँक आणि सुझलॉन एनर्जीचे शेअर्स 52 आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले आहेत, तर पेटीएमचे शेअर्स पुन्हा एकदा २० टक्क्यांनी घसरले आणि ते 487 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होते. 

Web Title: Stock market starts with a bang Sensex crosses 72200 Nifty also rose Paytm fell 20 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.