Join us  

शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, निफ्टी सपोर्ट लेव्हलवर; HDFC च्या शेअरमध्ये घसरण सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2024 9:37 AM

शुक्रवारी शेअर बाजारातील कामकाजाची सुरुवात घसरणीसह झाली. आजच्या गॅप डाउन ओपनिंग सेशनमध्ये निफ्टी २४२०० च्या महत्त्वाच्या सपोर्ट लेव्हलवर आला.

शुक्रवारी शेअर बाजारातील कामकाजाची सुरुवात घसरणीसह झाली. निफ्टी ८८ अंकांच्या घसरणीसह २४२१३ च्या पातळीवर उघडला, तर सेन्सेक्स २७१ अंकांच्या घसरणीसह ७९७७९ च्या पातळीवर व्यवहार करत होता. आजच्या गॅप डाउन ओपनिंग सेशनमध्ये निफ्टी २४२०० च्या महत्त्वाच्या सपोर्ट लेव्हलवर आला. पूर्वी ज्या प्रकारच्या बाजाराची वाटचाल झाली आहे, त्यावरून २४२००-२४१५० ही निफ्टीसाठी महत्त्वाची सपोर्ट लेव्हल असल्याचं म्हणता येईल.

सुरुवातीच्या व्यवहारात बँकिंग क्षेत्रात विक्रीचा दबाव दिसून येत आहे. एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये २.४० टक्क्यांची घसरण झाली. कोटक महिंद्राच्या शेअरमध्येही घसरण दिसून येत आहे. बाजार उघडल्यानंतर काही वेळातच एचडीएफसी बँकेचा शेअर ३ टक्क्यांनी घसरला.

आजच्या बाजारात हिंडाल्को, सिप्ला, बजाज ऑटो, विप्रो, डिव्हिस लॅब या कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी दिसून येत आहे, तर एचडीएफसी बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा स्टील, टायटन कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळत आहे. एचडीएफसी बँक लिमिटेडच्या शेअर्सची घसरण आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात कायम राहिली. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्येही या शेअरमध्ये घसरण झाली होती.

आजच्या कामकाजादरम्यान फार्मा आणि आयटी शेअर्समध्ये खरेदीदारांचा कल दिसून येत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीनं २४४०० ची पातळी गाठली, जिथून काही प्रॉफिट बुकिंग झालं. मात्र, निफ्टीचा एकंदरीत कल सकारात्मक असून जोपर्यंत निफ्टी २४२००-२४१५० च्या वर राहील, तोपर्यंत प्रत्येक घसरणीवर खरेदी होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :शेअर बाजार