Stock Market Today, 6 November: शेअर मार्केटमध्ये आज सलग तिसऱ्या दिवशी मोठी वाढ दिसून आली. सेन्सेक्स आणि निफ्टी, दोन्ही निर्देशांक हिरव्या लाईनवर बंद झाले. आज सेन्सेक्स 594.91 अंकांच्या किंवा 0.92 टक्क्यांच्या वाढीसह 64,958.69 च्या पातळीवर बंद झाला. तर निफ्टी निर्देशांक 181.15 अंकांच्या किंवा 0.94 टक्क्यांच्या वाढीसह 19,411.75 च्या पातळीवर बंद झाला.
आजच्या वाढीसह निफ्टी दोन आठवड्यांच्या उच्चांकावर बंद झाला आहे. दरम्यान, आज सरकारी बँकिंग निर्देशांकात घसरण दिसून आली. आज सेन्सेक्समधील टॉप 30 शेअर्सच्या यादीतील एसबीआय, एचयूएल, टाटा मोटर्स, टायटनचे शेअर्स घसरणीसह बंद झाले. तसेच, आज इतर 40 कंपन्यांच्या शेअर्समध्येही डाउनफॉल पाहायला मिळाला.
कोणत्या कंपनीचे शेअर्स वाढले
आज वाढणाऱ्या शेअर्सच्या यादीत एलटी आघाडीवर आहे. एलटी शेअर्स 2.3 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. याशिवाय अॅक्सिस बँक, पॉवर ग्रिड, बजाज फायनान्स, टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह, एशियन पेंट्स, इंडसइंड बँक, एम अँड एम, अल्ट्रा केमिकल, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, नेस्ले इंडिया, टेक महिंद्रा, टीसीएस, एनटीपीसी, रिलायन्स, जेएसडब्ल्यू स्टील, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, सन फार्मा, कोटक बँक, आयटीसी, विप्रो, एचसीएल टेक आणि मारुती यांचे शेअर्सही वधारले.