जहाज आणि पाणबुडी तयार करणारी कंपनी मझगांव डॉक शिपबिल्डर्सच्या (Mazagon Dock Shipbuilders) शेअर्समध्ये रॉकेट स्पीड दिसून आली आहे. हा शेअर मंगळवारी 8% हून अधिकने वाढून ₹4560 वर पोहोचला आहे. सोमवारी कंपनीचा शेअर 4200.15 रुपयांवर बंद झाला होता. मझगांव डॉक शिपबिल्डर्सला लवकरच एक मोठ्या ऑर्डर मिळण्याची आशा आहे. या शेअर शिवाय कोचीन शिपयार्ड आणि गार्डन रीच शिपबिल्डर्सच्या शेअर्समध्येही मंगळवारी चांगली तेजी दिसून आली.
कंपनीला 27000 कोटी रुपयांची ऑर्डर मिळण्याची अपेक्षा -
मझगांव डॉक शिपबिल्डर्सला 3 पाणबुड्यांसाठी 27000 कोटी रुपयांची ऑर्डर मिळण्याची अपेक्षा आहे. कंपनीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर संजीव सिंघल यांनी सीएनबीसी-टीव्ही 18 सोबत बोलताना यासंदर्भात माहिती दिली होती. ते म्हणाले होते, सध्याच्या ऑर्डर बुकची किंमत 40000 कोटी रुपये आहे. दरम्यान, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला 26000 कोटी रुपयांची मोठी ऑर्डर मिळाली आहे. एअरो इंजिनच्या पुरवठ्यासाठी कंपनीला ही ऑर्डर मिळाली आहे.
4 वर्षांत 2500% हून अधिकचा परताना -
मझगांव डॉक शिपबिल्डर्सचा शेअर गेल्या 5 वर्षात 2500% पेक्षाही अधिकने वधारला आहे. 16 ऑक्टोबर 2020 रोजी शिपिंग कंपनीचा शेअर 168.05 रुपयांवर होता. जो 3 सप्टेंबर 2024 रोजी 4560 रुपयांवर पोहोचा आहे. गेल्या एका वर्षात शिपिंग कंपनीच्या शेअर्समध्ये 140 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
कंपनीचा शेअर 4 सप्टेंबर 2023 रोजी 1908.55 रुपयांवर होता. जो 3 सप्टेंबर 2024 रोजी 4500 रुपयांच्याही पार पोहोचला आहे. गेल्या 6 महिन्यांत, कंपनीच्या शेअर्समध्ये 113% ची वाढ झाली आहे. या काळात कंपनीचा शेअर 2105.10 रुपयांवरून 4560 रुपयांपर्यंत वाढला आहे. कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 5859.95 रुपये, तर नीचांक 1742 रुपये एवढा आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)