Lokmat Money >शेअर बाजार > Stock Market Closing: शेअर बाजाराचं दमदार क्लोजिंग, गुंतवणूकदारांनी कमावले १.८१ लाख कोटी

Stock Market Closing: शेअर बाजाराचं दमदार क्लोजिंग, गुंतवणूकदारांनी कमावले १.८१ लाख कोटी

सेन्सेक्स आणि निफ्टी बुधवारी सलग चौथ्या दिवशी तेजीसह बंद झाले. सेन्सेक्स २८५ अंकांनी वधारला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 04:26 PM2024-07-31T16:26:08+5:302024-07-31T16:26:27+5:30

सेन्सेक्स आणि निफ्टी बुधवारी सलग चौथ्या दिवशी तेजीसह बंद झाले. सेन्सेक्स २८५ अंकांनी वधारला.

Stock Market Strong closing of share market investors earned 1 81 lakh crores | Stock Market Closing: शेअर बाजाराचं दमदार क्लोजिंग, गुंतवणूकदारांनी कमावले १.८१ लाख कोटी

Stock Market Closing: शेअर बाजाराचं दमदार क्लोजिंग, गुंतवणूकदारांनी कमावले १.८१ लाख कोटी

सेन्सेक्स आणि निफ्टी बुधवारी सलग चौथ्या दिवशी तेजीसह बंद झाले. सेन्सेक्स २८५ अंकांनी वधारला. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत आज दिवसभरात सुमारे १.८१ लाख कोटी रुपयांची वाढ झाली. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.८६ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. तर स्मॉलकॅप निर्देशांक ०.१४ टक्क्यांनी घसरला. आजच्या व्यवहारात युटिलिटी, मेटल आणि पॉवर शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली. दुसरीकडे रियल्टी शेअर्समध्ये नफावसुली दिसून आली.

व्यवहाराअंती बीएसई सेन्सेक्स २८५.९५ अंकांनी वधारून ८१,७४१.३४ अंकांवर बंद झाला. एनएसईचा ५० शेअर्सचा प्रमुख इंडेक्स निफ्टी ९३.८५ अंकांनी वधारून २४,९५१.१५ वर बंद झाला.

गुंतवणूकदारांनी कमावले १.८१ लाख कोटी रुपये

बीएसईमध्ये लिस्टेड कंपन्यांचं एकूण मार्केट कॅप ४६०.९१ लाख कोटी रुपयांवरून ३१ जुलै रोजी ४६२.७२ लाख कोटी रुपयांवर पोहोचलं. अशाप्रकारे बीएसईमध्ये लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप आज सुमारे १.८१ लाख कोटी रुपयांनी वाढलं. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे १.८१ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सर्वाधिक तेजी/घसरण झालेले ५ शेअर्स

बीएसई सेन्सेक्सचे ३० पैकी २१ शेअर्स आज तेजीसह बंद झाले. यामध्ये मारुती सुझुकीच्या शेअरमध्ये सर्वाधिक ३.९३ टक्क्यांची वाढ झाली. त्यापाठोपाठ जेएसडब्ल्यू स्टील, एशियन पेंट्स, एनटीपीसी आणि अदानी पोर्ट्सचे शेअर्स १.८३ ते ३.६४ टक्क्यांनी वधारले.

तर सेन्सेक्सचे उर्वरित ९ शेअर्स आज घसरणीसह बंद झाले. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे (आरआयएल) शेअर्स ०.५१ टक्क्यांनी सर्वाधिक घसरले. याशिवाय इन्फोसिस, टाटा मोटर्स, महिंद्रा अँड महिंद्रा आणि बजाज फायनान्सचे शेअर्स ०.३३% ते ०.४८% दरम्यान घसरले.

Web Title: Stock Market Strong closing of share market investors earned 1 81 lakh crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.