अर्थ मंत्रालयाने 30 ऑगस्टला 4 पीएसयू कंपन्यांना ‘नवरत्न’ चा दर्जा दिला. रेलटेल, एसजेव्हीएन, सोलर एनर्जी कार्पोरेशन आणि एनएचपीसी असे या चार कंपन्यांची नावे आहेत. यांपैकी Railtel, SJVN आणि NHPC या तीन कंपन्या शेअर बाजारात लिस्टेड आहेत. आज या कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे.
Railtel च्या शेअरमध्ये 5 टक्के तेजी -
बीएसईमध्ये कंपनीचा शेअर आज शुक्रवारच्या तुलनेत तेजीसह 510.10 रुपयांच्या पातळीवर खुला झाला, कंपनीचा इंट्रा-डे उच्चांक 5 टक्क्यांच्या वाढीसह 515.60 रुपयांपर्यंत पोहोचला होता. मात्र, शेअरच्या किमतीत पुन्हा घसरण दिसून आली. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्सच्या किमती 100 टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत.
एसजेव्हीएन लिमिटेड -
कंपनीचा शेअर आज 139.65 रुपयांच्या पातळीवर खुला झाला. कंपनीचा इंट्रा-डे उच्चांक 5 टक्क्यांच्या वाढीसह 140 रुपयांवर पोहोचला होता. 10.30 वाजण्याच्या सुमारास हा शेअर 136 रुपयांच्या झोनमध्ये होता. कंपनीत सरकार आणि एलआयसीची भागीदारी 81 टक्क्यांहून अधिक आहे.
3- एनएचपीसी -
आज बीएसईमध्ये कंपनीचा शेअर 96.20 रुपयांच्या पातळीवर खुला झाला. कंपनीच्या शेअरने पुन्हा एकदा 100 रुपयांचा टप्पा ओलांडला. कंपनीचा इंट्रा-डे उच्चांक 4.46 टक्क्यांच्या वाढीसह 100.50 रुपये होता. गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत 94 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या कंपनीत एलआयसीसह सरकारची एकूण हिस्सेदारी 67.40 टक्के एवढी आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)