Join us  

आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2024 9:18 AM

Share Market News : शेअर बाजारात शुक्रवार हा आठवड्याच्या कामकाजाचा अखेरचा दिवस असतो. अशा तऱ्हेने शनिवार आणि रविवारी शेअर बाजार बंद असतो.

Share Market News : शेअर बाजारात शुक्रवार हा आठवड्याच्या कामकाजाचा अखेरचा दिवस असतो. अशा तऱ्हेने शनिवार आणि रविवारी शेअर बाजार बंद असतो. बाजारात कोणत्याही प्रकारची ट्रेडिंग होत नाही. पण आज म्हणजेच २८ सप्टेंबरला शेअर बाजार खुला राहणार आहे. या दरम्यान विशेष ट्रेडिंग सेशनही होणार आहे. हे मॉक ट्रेडिंग सेशन असेल. शेअर बाजार शनिवारी उघडण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही शनिवारी असं झालं आहे.

दरम्यान, शनिवारी डिझास्टर रिकव्हरी साईटची चाचणी होणार आहे. एनएसईनं जारी केलेल्या परिपत्रकानुसार, शनिवार, २८ सप्टेंबर रोजी कॅपिटल मार्केट सेगमेंटमध्ये मॉक ट्रेडिंग सत्र चालणार आहे. तसंच टेस्टिंग फ्युचर्स अँड ऑप्शन्स (एफ अँड ओ) मध्ये ट्रेडिंग केलं जाईल. यावेळी डिझास्टर रिकव्हरी साईटवर स्विच ओव्हर केलं जाईल. जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीतही एक्स्चेंजच्या सेवेवर परिणाम होणार नाही आणि ती सुरळीत पणे चालू शकेल, याची काळजी घेता येईल.

किती वाजता होणार सेशन?

आपत्कालीन परिस्थितीतही एनएसई आपली सेवा सुरू ठेवू शकेल, हा या चाचणीचा उद्देश आहे. शनिवारी दुपारी १२ ते १ या वेळेत एनएसईकडून एक्स्चेंजची आपत्कालीन तपासणी केली जाणार आहे. तसंच ३० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत लाइव्ह ट्रेडिंग ही होणार आहे. हा व्यवहार डिझास्टर रिकव्हरी साईटवरून केला जाणार आहे. डिझास्टर साईट सर्व प्रकारच्या क्रिटिकल इन्स्टिट्युशनसाठी महत्त्वाची मानली जाते.

टॅग्स :शेअर बाजार