Lokmat Money >शेअर बाजार > सलग चौथ्या दिवशी शेअर बाजार घसरला; Axis, ICICI अन् Tata च्या गुंतवणूकदारांना फटका...

सलग चौथ्या दिवशी शेअर बाजार घसरला; Axis, ICICI अन् Tata च्या गुंतवणूकदारांना फटका...

गेल्या चार दिवसांपासून शेअर बाजार घसरत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 04:09 PM2024-07-25T16:09:53+5:302024-07-25T16:10:52+5:30

गेल्या चार दिवसांपासून शेअर बाजार घसरत आहे.

Stock Market Today 25 july 2024, Stock market falls for fourth day in a row | सलग चौथ्या दिवशी शेअर बाजार घसरला; Axis, ICICI अन् Tata च्या गुंतवणूकदारांना फटका...

सलग चौथ्या दिवशी शेअर बाजार घसरला; Axis, ICICI अन् Tata च्या गुंतवणूकदारांना फटका...

Stock Market Closing On 25 July 2024 : देशाचा अर्थसंकल्प सादर झाल्यापासून सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार घसरला. आजच्या(दि.25) सत्रात BSE सेन्सेक्स 109 अंकांच्या घसरणीसह 80,039 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 7 अंकांच्या घसरणीसह 24,406 अंकांवर बंद झाला. बँकिंग आणि कंझ्यूमर ड्युरेबल्सच्या शेअर्समध्ये झालेल्या विक्रीमुळे बाजारात ही घसरण दिसून आली. 

वाढणारे आणि घसरणारे शेअर्स
आजच्या ट्रेडिंग सत्रात टाटा मोटर्स 6.17 टक्के, एलअँडटी 2.94 टक्के, सन फार्मा 2.81 टक्के, कोटक महिंद्रा बँक 1.67 टक्के, एचडीएफसी बँक 0.72 टक्के, पॉवर ग्रिड 0.61 टक्के, बजाज फायनान्स 0.59 टक्के, टीसीएस 0.39 टक्के, एचसीएल 30 टक्के वाढीसह बंद झाले. तर ॲक्सिस बँक 5.19 टक्के, नेस्ले 2.49 टक्के, आयसीआयसीआय 2.02 टक्के, टायटन 1.95 टक्के, टाटा स्टील 1.87 टक्के, इंडसइंड बँक 1.21 टक्के आणि आयटीसी 0.86 टक्के घसरणीसह बंद झाले.

मार्केट कॅपमध्ये वाढ
शेअर बाजारात घसरण झाली असली तरी ऑटो शेअर्समध्ये झालेल्या खरेदीमुळे बाजारभावात वाढ झाली आहे. बीएसईवर सूचीबद्ध शेअर्सचे बाजार भांडवल 449.92 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे मागील सत्रात 449.42 लाख कोटी रुपयांवर होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 50,000 कोटींची वाढ झाली आहे.

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

Web Title: Stock Market Today 25 july 2024, Stock market falls for fourth day in a row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.