Join us

Stock Market Today: आयटी, ऑटो शेअरनं खराब केला शेअर बाजाराचा मूड; Sensex-Nifty मध्ये घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 4:14 PM

Stock Market Today: गुंतवणूकदारांच्या नफावसुलीमुळे बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. बँकिंग, आयटी आणि ऑटो शेअर्समध्ये जोरदार विक्री दिसून आली.

Stock Market Today: गुंतवणूकदारांच्या नफावसुलीमुळे बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. बँकिंग, आयटी आणि ऑटो शेअर्समध्ये जोरदार विक्री दिसून आली. मिडकॅप शेअर्समध्येही आजच्या सत्रात घसरण नोंदवण्यात आली. कामकाजाच्या अखेरिस बीएसई सेन्सेक्स ३१९ अंकांनी घसरून ८१,५०१ अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८६ अंकांनी घसरून २४,९७१ अंकांवर बंद झाला.

या शेअर्समध्ये तेजी / घसरण

सेन्सेक्सचे ३० पैकी केवळ ५ शेअर्स वधारले. २५ शेअर्स घसरून बंद झाले. निफ्टीच्या ५० शेअर्सपैकी १६ शेअर वधारले तर ३४ घसरले. एचडीएफसी लाइफ १.७९ टक्के, डॉ. रेड्डीज १.३४ टक्के, ग्रासिम १.०५ टक्के, एचडीएफसी बँक ०.९७ टक्के, बजाज ऑटो ०.८८ टक्के, भारती एअरटेल ०.८६ टक्क्यांनी वधारले. तर महिंद्रा अँड महिंद्रा २.७६ टक्के, इन्फोसिस २.०५ टक्के, कोटक महिंद्रा बँक १.३९ टक्के, अदानी पोर्ट्स १.२१ टक्के, टाटा मोटर्स १.१९ टक्के, आयटीसी १.११ टक्के, टायटन १.०६ टक्क्यांनी घसरुन बंद झाले.

क्षेत्रीय अपडेट्स

आजच्या कामजादरम्यान एनर्जी, ऑईल व गॅस, पायाभूत सुविधा, रिअल इस्टेट या क्षेत्रांना गती मिळाली. आयटी, ऑटो, फार्मा, एफएमसीजी, मेटल्स, मीडिया, कन्झ्युमर ड्युरेबल्स आणि हेल्थकेअर क्षेत्रातील शेअर्स घसरणीसह बंद झाले. आजच्या व्यवहारात मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही घसरण झाली.

८० हजार कोटींचा झटका

बाजारातील घसरणीमुळे आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचं नुकसान झालं. बीएसईमध्ये लिस्टेड शेअर्सचं बाजार भांडवल ४६३.०६ लाख कोटी रुपयांवर बंद झालं, जे मागील सत्रात ४६३.८६ लाख कोटी रुपये होतं. म्हणजेच आजच्या सत्रात मार्केट कॅप ८०००० कोटी रुपयांनी कमी झाले आहे.

टॅग्स :शेअर बाजार