Stock Market Today: शेअर बाजारात आज २८ मार्चपासून एप्रिल सीरिजला सुरुवात होत आहे. आज संमिश्र संकेतांमुळे बाजाराची सुरुवात किरकोळ वाढीसह झाली. त्यानंतर बाजार थोड्या ग्रीन आणि रेड झोनमध्ये झुलताना दिसला. सुरुवातीला सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला होता. निफ्टीही जवळपास ३० अंकांच्या वाढीसह २३,६०० च्या वर होता. बँक निफ्टी ११० अंकांनी वधारला. तर मिडकॅप निर्देशांक ३०० अंकांनी वधारला होता. मात्र काही वेळातच सेन्सेक्समध्ये घसरण झाली.
गिफ्ट निफ्टीमध्ये किंचित घसरण झाली होती, पण प्री-ओपनिंगमध्ये बाजार तेजीसह उघडण्याची चिन्हे दिसत होती. एफआयआयनं काल कॅश मार्केटमध्ये ११,१११ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली. पाच महिन्यांच्या सलग विक्रीनंतर परदेशी गुंतवणूकदारांनी मार्चमध्ये ६३६७ कोटी रुपयांची खरेदी केली.
जागतिक बाजारपेठेतील संकेत
आज सकाळी गिफ्ट निफ्टी २५ अंकांनी घसरून २३७५० च्या जवळ आला. डाऊ फ्युचर्स ३५ अंकांनी वधारला, तर निक्केई ७५० अंकांनी घसरला. ट्रम्प यांनी वाहन क्षेत्रावरील शुल्कामुळे काल सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकी बाजारात घसरण झाली. डाऊ १५० अंकांनी घसरला, तर नॅसडॅक १०० अंकांनी घसरून बंद झाला. सलग सातव्या दिवशी कच्च्या तेलाचा भाव ७३ डॉलरच्या वर आहे. हा भाव एका महिन्याच्या उच्चांकी पातळीवर पोहोचलाय. आजपासून ३ नव्या कंपन्या एफ अँड ओमध्ये सामील झाल्यात. हिंदुस्थान झिंक, आयनॉक्स विंड आणि पीएनबी हाऊसिंग फायनान्स यांनी यात एन्ट्री केलीये.