Join us  

शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्स-निफ्टी घसरले; गुंतवणूकदारांचे ₹ 8 लाख कोटी बुडाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 4:39 PM

Stock Market Today : आजच्या सत्रात Tata, JSW, अल्ट्राटेक, महिंद्रा, रिलायन्सला मोठा फटका.

Stock Market Closing On 19 July 2024 : येत्या 23 जुलै रोजी देशाचा पूर्ण अर्थसंकल्प सादर होणार आहे. तत्पुर्वी शेअर बाजारातगुंतवणूक करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. आज(दि.19) आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात शेअर बाजार कोसळला. BSE SENSEX 739 अंकांनी घसरुन 80,604 अंकांवर बंद झाला. तर, NSE NIFTI 270 अंकांनी घसरुन 24,530 अंकांवर बंद झाला आहे. आजच्या सत्रात एनर्जी, ऑटो आणि कंझ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रातील शेअर्स मोठ्या प्रमाणात घसरले. 

गुंतवणूकदारांचे 8 लाख कोटींचे नुकसान भारतीय शेअर बाजारातील प्रचंड घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. बीएसईवर सूचीबद्ध शेअर्सचे बाजार भांडवल 446.25 लाख कोटी रुपयांवर आले, जे मागील सत्रात 454.32 लाख कोटी रुपयांवर होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे तब्बल 8.07 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

वाढणारे आणि घसरणारे शेअर्सआजच्या सत्रात इन्फोसिस 1.92 टक्के, आयटीसी 0.89 टक्के, एशियन पेंट्स 0.53 टक्के, एचसीएल टेक 0.03 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. तर, टाटा स्टील 5.17 टक्के, जेएसडब्ल्यू स्टील 4.36 टक्के, एनटीपीसी 3.51 टक्के, टाटा मोटर्स 3.43 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 3.28 टक्के, टेक महिंद्रा 3.16 टक्के, विप्रो 2.78 टक्के, पॉवर ग्रिड 2.58 टक्के, फिनन्स 2.41 टक्के, रिलायन्स 2.4 टक्के घसरले.

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी मार्केट तज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक