Join us  

शेअर बाजार घसरला; Sensex 80148 तर Nifti 24413 अंकांवर आला...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 4:13 PM

Stock Market Today : आजच्या सत्रात आयटी, फार्मा, एनर्जी, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर, आणि ऑटो शेअर्स वधारले.

Stock Market Closing On 24 July 2024 : काल अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता आज(24 जुलै) शेअर बाजार मोठ्या प्रमाणात घसरला. BSE सेन्सेक्स 280 अंकांनी घसरुन 80,148 वर आला, तर NSE निफ्टी 65 अंकांनी घसरुन 24,413 वर आला. आजच्या व्यवहारात टेक महिंद्रा 2.71 टक्के, एनटीपीसी 2.68 टक्के, टाटा मोटर्स 2.65 टक्के, सन फार्मा 1.08 टक्के, पॉवर ग्रीड 0.94 टक्के, एशियन पेंट्स 0.51 टक्के वाढीसह बंद झाले. तर बजाज फिनसर्व्ह 2.43 टक्के, बजाज फायनान्स 1.81 टक्के, एचयूएल 1.80 टक्के, अदानी पोर्ट्स 1.58 टक्के घसरणीसह बंद झाले.

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढसेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण होऊनही मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सच्या वाढीमुळे शेअर बाजाराचे बाजार भांडवल वाढीसह बंद झाले. बीएसईवर लिस्टेड एकूण शेअर्सचे बाजार भांडवल 449.67 लाख कोटी रुपयांवर बंद झाले, जे गेल्या ट्रेडिंग सत्रात 446.80 लाख कोटींवर आले होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 2.87 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 

सेक्टरॉल अपडेटआजच्या ट्रेडिंग सत्रात आयटी, फार्मा, मीडिया, एनर्जी, कंझ्युमर ड्युरेबल्स, हेल्थकेअर, ऑइल अँड गॅस, रिअल इस्टेट आणि ऑटो शेअर्स वाढीसह बंद झाले. तर बँकिंग आणि एफएमसीजी क्षेत्रातील शेअर्समध्ये विक्री दिसून आली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समधील खरेदीमुळे निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक 587 अंकांच्या उसळीसह 56,872 अंकांवर बंद झाला, तर निफ्टीचा स्मॉलकॅप निर्देशांक 323 अंकांच्या उसळीसह बंद झाला. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 12 वाढीसह आणि 18 तोट्यासह बंद झाले.

(टीप- शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागारीच मदत घ्या. )

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूककेंद्रीय अर्थसंकल्प 2019