Join us

Stock Market Today: १०० अंकांच्या तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, मेटल स्टॉक्समध्ये बंपर तेजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 09:48 IST

Share Market Today: शेअर बाजारात आज फ्लॅट व्यवहारास सुरुवात झाली. सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्स ४ अंकांच्या तेजीसह ७७,९७६ वर उघडला.

Share Market Today: शेअर बाजारात आज फ्लॅट व्यवहारास सुरुवात झाली. सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्स ४ अंकांच्या तेजीसह ७७,९७६ वर उघडला. निफ्टी २ अंकांनी वधारून २३,७०० वर उघडला. बँक निफ्टी ३३ अंकांनी वधारून ५१,६४० वर पोहोचला. तर, रुपया ८५.७६ च्या तुलनेत ८५.७९/डॉलरवर उघडला. विशेष म्हणजे आज निफ्टीचे सर्व सेक्टोरल इंडेक्स ग्रीन मार्कमध्ये ट्रेड करत आहेत. मेटल शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी पाहायला मिळत आहे. तर एफएमसीजी आणि फार्मा निर्देशांकात घसरण दिसून आली.

या शेअर्समध्ये तेजी/घसरण

कामकाजादरम्यान इंडसइंड बँक, पॉवरग्रिड, भारती एअरटेल, बजाज फिनसर्व्ह आणि महिंद्राच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर दुसरीकडे एशियन पेंट्स, एनटीपीसी, मारुती, झोमॅटोच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

भारतीय शेअर बाजारात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची (FII) खरेदी सुरूच आहे. काल एफआयआयनं रोख बाजारातील ५,४०० कोटी रुपयांसह एकूण ८,१३५ कोटी रुपयांची निव्वळ खरेदी केली, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (डीआयआय) २,८०० कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली.

काल बाजार ग्रीन झोनमध्ये बंद

अमेरिकेच्या बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी दिसून आली. चढ-उतारांच्या दरम्यान डाऊ जोन्स केवळ ४ अंकांनी वधारला असला तरी नॅसडॅकनं ८० अंकांच्या मजबुतीसह दिवसाच्या उच्चांकी पातळीवर व्यवहार संपवला. ट्रम्प यांच्या धोरणांमुळे अमेरिकी ग्राहकांचा विश्वास डळमळीत होताना दिसत असल्यानं मार्च २०२५ मध्ये अमेरिकी ग्राहकांचा विश्वास चार वर्षांतील नीचांकी पातळीवर घसरला. 

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक