Lokmat Money >शेअर बाजार > केंद्रात तिसऱ्यांदा मोदी सरकार; शेअर बाजाराची जोरदार मुसंडी, सेन्सेक्स पुन्हा 75,000 पार...

केंद्रात तिसऱ्यांदा मोदी सरकार; शेअर बाजाराची जोरदार मुसंडी, सेन्सेक्स पुन्हा 75,000 पार...

Stock Market Today: पीएम नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात पुन्हा एकदा NDA चे सरकार स्थापन होणार आहे, याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 04:23 PM2024-06-06T16:23:50+5:302024-06-06T16:24:18+5:30

Stock Market Today: पीएम नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात पुन्हा एकदा NDA चे सरकार स्थापन होणार आहे, याचा परिणाम शेअर बाजारावर दिसून आला.

Stock Market Today: Third time Modi government at the center; Strong stock market rally, Sensex crosses 75,000 again | केंद्रात तिसऱ्यांदा मोदी सरकार; शेअर बाजाराची जोरदार मुसंडी, सेन्सेक्स पुन्हा 75,000 पार...

केंद्रात तिसऱ्यांदा मोदी सरकार; शेअर बाजाराची जोरदार मुसंडी, सेन्सेक्स पुन्हा 75,000 पार...

Stock Market Closing On 6 June 2024 : लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही, पण मित्रपक्षांच्या पाठिंब्याने केंद्रात NDA ची सत्ता स्थापन होणार आहे. याचा परिणाम आज शेअर मार्केटवर पण दिसला. आज सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात जोरदार वाढ झाली. आजच्या सत्रात आयटी आणि एनर्जी शेअर्सने जोरदार मुसंडी मारली. दिवसाच्या शेवटी बीएसई सेन्सेक्स 692 अंकांच्या उसळीसह 75,000 पार करत 75,074 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 201 अंकांच्या उसळीसह 22,821 अंकांवर बंद झाला.

मार्केट कॅपमध्ये 8 लाख कोटींची वाढ
शेअर बाजारातील नेत्रदीपक वाढीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 8 लाख कोटी रुपयांहून अधिकची वाढ झाली. बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल 416.32 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे गेल्या सत्रात 408.06 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच, आजच्या सत्रात गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 8.26 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. 

वाढणारे आणि घसरणारे शेअर्स
आजच्या व्यवहारात टेक महिंद्रा 4.07%, एचसीएल टेक 4.04%, एसबीआय 3.46%, इन्फोसिस 2.95%, एनटीपीसी 2.65%, टीसीएस 2.24%, एलअँडटी 2.24%, विप्रो 2.09%, भारती एअरटेल 1.91%, 1.91%, 1.91%, 1.6%, 1.74%. टक्के, आयटीसी 1.28 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. तर एचयूएल 2.04 टक्के, एशियन पेंट्स 1.88 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 1.57 टक्के, नेस्ले इंडिया 1.36 टक्के, सन फार्मा 0.97 टक्के घसरणीसह बंद झाले.

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 23 वाढीसह आणि 7 तोट्यासह बंद झाले. आज एकूण 3945 शेअर्समध्ये व्यवहार झाले, त्यापैकी 3010 समभाग वाढीसह बंद झाले तर 833 तोट्यासह बंद झाले. 

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: Stock Market Today: Third time Modi government at the center; Strong stock market rally, Sensex crosses 75,000 again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.