Stock Market Closing On 22th August 2022: शेअर बाजारासाठी आठवड्याचा पहिलाच दिवस वाईट ठरला. कामकाजाच्या सुरूवातीच्या सत्रात शेअर बाजाराच्या निर्देशांकात घसरण दिसून आली होती. कामाकाजाच्या अखेरच्या सत्रातही ती कायम राहिल्याचं चित्र सोमवारी निर्माण झालं. सोमवारी शेअर बाजाराच्या निर्देशांकात ८०० अंकांपेक्षा अधिक घसरण दिसून आली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकातही २५० अंकांची घसरण झाली.
कामकाजाच्या अखेरच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ८७२.२८ अंक म्हणजेच १.४६ टक्क्यांनी घसरून ५८,७७३.८७ अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात २६४.९० अंकांची घसरण झाली आणि तो १७,४९३.५५ अंकांवर बंद झाला.
दुसरीकडे ग्लोबल मार्केटमध्येही घसरणीचे संकेत मिळाले आहेत. पुन्हा एकदा व्याजदर वाढण्याच्या शक्यतांमुळे युएस मार्केटमध्ये घसरण दिसून आली. डाऊ जोंस ३०० अंक आणि नॅस्डॅक २६० अंकांनी घसरला. एसजीएक्स निफ्टीदेखील ७५ अंकांनी घसरून १७,६६९ वर ट्रेड करत होता.
आज एलआयसीच्या शेअरमध्ये घसरण दिसून आली. एलआयसीच्या शेअरमध्ये आज १०.४० टक्क्यांची घसरण झाली आणि तो ६७५.५५ अंकांवर बंद झाला.