Stock Market Updates: देशांतर्गत शेअर बाजारात निफ्टीची साप्ताहिक मुदत गुरुवारी (५ डिसेंबर) संपली. अस्थिर बाजारात आज तेजीचे पुनरागमन झालेलं पाहायला मिळालं. आज बाजारात मोठी वाढ झाली असून सलग पाचव्या दिवशी बाजार हिरव्या रंगात बंद झाले. निफ्टी २४० अंकांनी वाढून २४,७०८ वर बंद झाला. सेन्सेक्स ८०९ अंकांनी वाढून ८१,७६५ वर आणि निफ्टी बँक ३३६ अंकांनी वाढून ५३,६०३ वर बंद झाला.
कालच्या बंदनंतर, आजच्या ओपनिंगमध्ये सेन्सेक्स २२६ अंकांनी ८१,१८२ वर उघडला. निफ्टी ७२ अंकांनी वाढून २४,५३९ वर पोहचला. तर बँक निफ्टी ८८ अंकांनी वाढून ५३,३५४ वर उघडला होता. ट्रेंट, इन्फोसिस, टीसीएस, टायटन, डॉ रेड्डी यांनी निफ्टीवर सर्वाधिक वाढ नोंदवली. सर्वात मोठी घसरण एसबीआय लाईफ, एचडीएफसी लाईफ, बजाज ऑटो, एनटीपीसी, ग्रासिममध्ये झाली.
या शेअर्समध्ये वाढ
निफ्टी पॅकच्या ५० शेअर्समध्ये आज ट्रेंटमध्ये सर्वाधिक ३.३१ टक्के, इन्फोसिसमध्ये २.४२ टक्के, टीसीएसमध्ये २.३१ टक्के, टायटनमध्ये २.१९ टक्के आणि डॉ. रेड्डीजमध्ये २.१८ टक्के वाढ नोंदवण्यात आली. त्याचवेळी, एसबीआय लाईफमध्ये १.२१ टक्के, एचडीएफसी लाइफमध्ये १.०९ टक्के, बजाज-ऑटोमध्ये १.०५ टक्के, एनटीपीसीमध्ये ०.९० टक्के आणि ग्रासिममध्ये ०.३८ टक्क्यांनी मोठी घसरण नोंदवली गेली.
निफ्टी आयटीमध्ये सर्वाधिक उसळी
क्षेत्रीय निर्देशांकांबद्दल बोलायचे झाले तर आज निफ्टी आयटीमध्ये सर्वाधिक १.९५ टक्क्यांची वाढ दिसून आली. याशिवाय निफ्टी बँक ०.६३ टक्के, निफ्टी ऑटो ०.६५ टक्के, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेस ०.६९ टक्के, निफ्टी एफएमसीजी ०.५८ टक्के, निफ्टी मेटलमध्ये ०.५७ टक्के, निफ्टी फार्मामध्ये ०.१८ टक्के, निफ्टी प्रायव्हेट बँकेत ०.६९ टक्के, निफ्टी हेल्थकेअर इंडेक्समध्ये ०.४८ टक्के, निफ्टी कंझ्युमर ड्युरेबल्समध्ये ०.५२ टक्के, निफ्टी ऑइल अँड गॅसमध्ये ०.७४ टक्के, निफ्टी मिडस्मॉल हेल्थकेअरमध्ये ०.४६ टक्के वाढ दिसून आली. याशिवाय निफ्टी रियल्टीमध्ये ०.२५ टक्के आणि निफ्टी पीएसयू बँकेत ०.१२ टक्क्यांची घसरण दिसून आली.