Lokmat Money >शेअर बाजार > Stock Market Updates: शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला लाइफ इन्शुरन्स शेअर्स वधारले

Stock Market Updates: शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला लाइफ इन्शुरन्स शेअर्स वधारले

Stock Market Updates : देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात शुक्रवारी तेजीसह झाली. सेन्सेक्स जवळपास २०० अंकांनी वधारला. तर निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह २४,००० च्या जवळपास पोहोचण्याचा प्रयत्न करत होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2024 10:16 AM2024-11-29T10:16:19+5:302024-11-29T10:16:19+5:30

Stock Market Updates : देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात शुक्रवारी तेजीसह झाली. सेन्सेक्स जवळपास २०० अंकांनी वधारला. तर निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह २४,००० च्या जवळपास पोहोचण्याचा प्रयत्न करत होता.

Stock Market Updates Big rally in the stock market Sensex rises by 200 points life insurance shares rise | Stock Market Updates: शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला लाइफ इन्शुरन्स शेअर्स वधारले

Stock Market Updates: शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला लाइफ इन्शुरन्स शेअर्स वधारले

Stock Market Updates : देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात शुक्रवारी तेजीसह झाली. सेन्सेक्स जवळपास २०० अंकांनी वधारला. तर निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह २४,००० च्या जवळपास पोहोचण्याचा प्रयत्न करत होता. बँक निफ्टी १५० अंकांनी वधारला आणि ५२,००० च्या वर व्यवहार करत होता. त्यापूर्वी सेन्सेक्स कालच्या बंदच्या तुलनेत ११ अंकांनी घसरून ७९,०३२ वर उघडला. निफ्टी १३ अंकांनी वधारून २३,९२७ वर उघडला. तर बँक निफ्टी ७८ अंकांनी वधारून ५१,९८४ वर उघडला.

कामकाजाच्या सुरुवातीला लाइफ इन्शुरन्स शेअर्समध्ये चांगली वाढ नोंदवली जात होती. एसबीआय लाइफ, एचडीएफसी लाइफचे शेअर्स चांगले वधारले. याशिवाय निफ्टीवर महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, टाटा कन्झ्युमर, विप्रो, एचसीएल टेक या कंपन्यांचे समभाग सर्वाधिक वधारले. तर, पॉवरग्रिड, ग्रासिम, ब्रिटानिया, टेक महिंद्रा मध्ये सर्वात मोठी घसरण नोंदवली गेली.

गुरुवारी निफ्टीच्या मंथली एक्सपायरीनंतर देशांतर्गत शेअर बाजारात पुन्हा मोठी घसरण पाहायला मिळाली. एफआयआयनं ११७५६ कोटी रुपयांची मोठ्या प्रमाणात विक्री केली आणि निर्देशांक, स्टॉक फ्युचर्समध्ये ६३०० कोटी रुपयांपेक्षा जास्तची विक्री केली. दुसरीकडे देशांतर्गत फंडांनी ८७०० कोटींची खरेदी केली.

डिसेंबर सीरिजची सुरुवात निफ्टीवर होत आहे. आज बीएसई, झोमॅटो, सीएएमएस, सीडीएसएल आणि डीमार्ट सह ४५ शेअर्स एफ अँड ओमध्ये सामील होतील. गिफ्ट निफ्टी आज सकाळी २४१०० च्या जवळ फ्लॅट होता. डाऊ फ्युचर्स ५० अंकांनी वधारले. निक्केई ३५० अंकांनी घसरला.

Web Title: Stock Market Updates Big rally in the stock market Sensex rises by 200 points life insurance shares rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.