Stock Market : भारतीय शेअर बाजाराची सुरुवात ग्रीन सिग्नलमध्ये झाली होती. मात्र, दिवसभरात अनेक सेक्टरमध्ये झालेल्या पडझडीनंतर बाजार लाल रंगात बंद झाला. मंगळवारी पुन्हा एकदा शेअर बाजारात मोठी त्सुनामी पाहायला मिळाली. आज BSE सेन्सेक्स ८२०.९७ अंकांच्या घसरणीसह ७८,६७५.१८ अंकांवर बंद झाला तर NSE निफ्टी ५० देखील २५७.८५ अंकांच्या मोठ्या घसरणीसह २३,८८३.४५ अंकांवर बंद झाला.
सेन्सेक्समधील ३० पैकी २६ कंपन्यांचे शेअर्य आपटले
सेन्सेक्समधील ३० पैकी २६ कंपन्यांचे शेअर्स नुकसानासह लाल रंगात बंद झाले. केवळ ३ कंपन्यांचे समभाग किंचित वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले, तर रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्समध्ये आज कोणताही बदल न करता बंद झाले. निफ्टी ५० मधील ५० पैकी ४६ कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह लाल चिन्हात बंद झाले आणि केवळ ४ कंपन्यांचे शेअर्स वाढीसह हिरव्या चिन्हात बंद झाले.
NTPC मध्ये सर्वात मोठी घसरण
सेन्सेक्स कंपन्यांपैकी एनटीपीसीच्या समभागांमध्ये आज सर्वाधिक ३.०६ टक्क्यांची घसरण झाली. याशिवाय एचडीएफसी बँक २.७३ टक्के, एशियन पेंट्स २.६५ टक्के, स्टेट बँक ऑफ इंडिया २.५२ टक्के, टाटा मोटर्स २.४६ टक्के, जेएसडब्ल्यू स्टील २.२८ टक्के, मारुती सुझुकी २.२७ टक्क्यांनी, पॉवरग्रिड २.१२ टक्क्यांनी, अदानी पोर्ट्स २.०२ टक्के, बजाज फायनान्स १.९८ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा १.६८ टक्के, बजाज फिनसर्व्ह १.६१ टक्के, नेस्ले इंडिया १.४३ टक्के, कोटक बँकेचे १.३८ टक्क्यांनी घसरले.
या ३ कंपन्यांचे शेअर्स हिरव्या रंगात बंद झाले
यासोबतच ॲक्सिस बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, लार्सन अँड टुब्रो, अल्ट्राटेक सिमेंट, टेक महिंद्रा, आयटीसी, टाटा स्टील, टायटन, टीसीएस, भारती एअरटेल, एचसीएल टेक आणि इंडसइंड बँकेचे शेअर्सही घसरले. आज सन फार्माचे शेअर्स ०.२८ टक्के, इन्फोसिसचे शेअर्स ०.०६ टक्के आणि आयसीआयसीआय बँकेचे शेअर्स ०.०४ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.