Lokmat Money >शेअर बाजार > Stock Market Updates: Nifty २४,५०० पार, सेन्सेक्स ८१ हजारांच्या जवळ; BEL टॉप गेनर

Stock Market Updates: Nifty २४,५०० पार, सेन्सेक्स ८१ हजारांच्या जवळ; BEL टॉप गेनर

पाहा आज कोणते शेअर्स वधारले आणि कोणत्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 10:13 AM2024-12-04T10:13:32+5:302024-12-04T10:13:32+5:30

पाहा आज कोणते शेअर्स वधारले आणि कोणत्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

Stock Market Updates Nifty crosses 24500, Sensex near 81 thousand BEL Top Gainer | Stock Market Updates: Nifty २४,५०० पार, सेन्सेक्स ८१ हजारांच्या जवळ; BEL टॉप गेनर

Stock Market Updates: Nifty २४,५०० पार, सेन्सेक्स ८१ हजारांच्या जवळ; BEL टॉप गेनर

देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात बुधवारी फ्लॅट झाली. निफ्टी तब्बल २५ अंकांनी वधारला. निर्देशांक २४,४८० च्या आसपास होता. त्यानंतर काही वेळातच त्याने २४,५०० चा टप्पा गाठला. तर सेन्सेक्स ६० अंकांनी वधारून ८०,९०० च्या जवळ आला. निफ्टी बँकही ३० अंकांच्या वाढीसह ५२,७२२ च्या जवळ व्यवहार करत होता. 

कालच्या बंदच्या तुलनेत बाजाराची सुरुवात किरकोळ तेजीनं झाली असली तरी त्यानंतर सुरुवातीच्या व्यवहारात फ्लॅट ट्रेडिंग दिसून आलं. सेन्सेक्स १९१ अंकांनी वधारून ८१,०३६ वर खुला झाला. निफ्टी ३१ अंकांनी वधारून २४,४८८ वर आणि बँक निफ्टी ८० अंकांनी वधारून ५२,७७५ वर उघडला.

निफ्टीवर बीईएल, अपोलो हॉस्पिटल, आयटीसी, टायटन, एनटीपीसीमध्ये तेजी होती. तर पॉवर ग्रिड, इन्फोसिस, महिंद्रा अँड महिंद्रा, एचसीएल टेक, भारती एअरटेल या शेअरमध्ये घसरण झाली. सकाळी जागतिक बाजारातून संमिश्र संकेत मिळाले. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या वतीनंही खरेदी सुरू झाली आहे, त्यामुळे बाजाराची धारणा सुधारत आहे. एफआयआयनं काल कॅश आणि इंडेक्स फ्युचर्समध्ये ५७०० कोटींपेक्षा जास्त खरेदी केली, तर देशांतर्गत फंडांनी २५० कोटींची छोटी विक्री केली.

Web Title: Stock Market Updates Nifty crosses 24500, Sensex near 81 thousand BEL Top Gainer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.