Stock Market Updates: मजबूत जागतिक संकेत असूनही भारतीय शेअर बाजार आठवड्याच्या शेवटच्या दिवशी घसरणीसह उघडला. आशियाई बाजारात तेजी असली तरी बीएसई सेन्सेक्स १२३ अंकांनी घसरून ८१,४७१ वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १३ अंकांनी घसरून २४९८५ अंकांवर उघडला.
तर दुसरीकडे बाजारात प्री-ओपनिंग सेशनमध्ये शेअर बाजारात तेजी दिसून येत होती. सेन्सेक्स १४१.९४ अंकांनी म्हणजेच ०.१७ टक्क्यांच्या वाढीसह ८१,७५३.३५ च्या पातळीवर व्यवहार करत होता. तर निफ्टी ८.२० अंकांनी म्हणजेच ०.०३ टक्क्यांच्या वाढीसह २५,००६.६५ वर व्यवहार करत होता.
या शेअर्समध्ये तेजी / घसरण
सेन्सेक्सच्या ३० शेअर्सपैकी १० शेअर्स वधारत असून २० शेअर्समध्ये घसरण दिसून आली. एचसीएल टेक १.४१ टक्के, जेएसडब्ल्यू स्टील ०.८४ टक्के, सन फार्मा ०.४६ टक्के, टाटा स्टील ०.३८ टक्के, इन्फोसिस ०.३७ टक्के, रिलायन्स ०.३४ टक्के, टेक महिंद्रा ०.२७ टक्के, इंडसइंड बँक ०.१५ टक्के, टाटा मोटर्स ०.१२ टक्के, एचयूएल ०.०६ टक्क्यांनी वधारले. तर दुसरीकडे भारती एअरटेल ०.७९ टक्के, पॉवरग्रिड ०.७८ टक्के, बजाज फायनान्स ०.७५ टक्के, एशियन पेंट्स ०.६६ टक्के, आयसीआयसीआय बँक ०.५७ टक्के, टीसीएस ०.५५ टक्के, बजाज फिनसर्व्ह ०.५१ टक्क्यांनी घसरले.
जागतिक बाजारपेठेची स्थिती
आशियाई शेअर बाजारात तेजी दिसून आली होती. निक्केई ०.५९ टक्के, स्ट्रेट्स टाइम्स ०.२० टक्के, तैवान १.३२ टक्के, कोस्पी ०.२६ टक्क्यांनी वधारला आहे. मात्र, चीनचा शेअर बाजार शांघाय कंपोझिट १.५६ टक्क्यांनी घसरला आहे.