Lokmat Money >शेअर बाजार > Stock Market: शेअर मार्केटमध्ये नुकसान कमी करण्यासाठी काय करावं? असं वाढेल साईड इन्कम

Stock Market: शेअर मार्केटमध्ये नुकसान कमी करण्यासाठी काय करावं? असं वाढेल साईड इन्कम

Stock Market Update: शेअर बाजारातून साइड इन्कमही करता येते. त्यासाठी काही गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 02:54 PM2022-09-06T14:54:21+5:302022-09-06T15:12:34+5:30

Stock Market Update: शेअर बाजारातून साइड इन्कमही करता येते. त्यासाठी काही गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत.

Stock Market: What to do to reduce losses in the stock market? This will increase the side income | Stock Market: शेअर मार्केटमध्ये नुकसान कमी करण्यासाठी काय करावं? असं वाढेल साईड इन्कम

Stock Market: शेअर मार्केटमध्ये नुकसान कमी करण्यासाठी काय करावं? असं वाढेल साईड इन्कम

मुंबई - शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणारे लोक अनेकदा भरपूर फायदा मिळवतात, तर कधी कधी शेअर बाजारात अनेकांना मोठ्या प्रमाणावर नुकसानीचा सामनाही करावा लागतो. त्यामागे अनेक कारणे असतात. मात्र शेअर बाजारातून साइड इन्कमही करता येते. त्यासाठी काही गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत. किंग रिसर्च अँकँडमीचे संस्थापक हरिंदर साहू यांनी शेअर मार्केटमधून साईड इन्कम कमाई करण्याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. ही माहिती गुंतवणूकदारांसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते.

फुल टाईम 
किंग रिसर्च अॅकॅडमीचे फाउंडर हरिंदर साहू यांनी सांगितले की, शेअर मार्केटमधून बऱ्यापैकी साईड इन्कम मिळवली जाऊ शकते. मात्र त्यासाठी महत्त्वाची बाब म्हणजे जे गुंतवणूकदार शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत आहेत ते फुल टाइम याला द्या. आता हा फुल टाइम दोन तासांचा असो वा तीन तासांचा एका अनुशासित पद्धतीने शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करून कमाई केली जाऊ शकते. 

चुकांमधून शिकणे 
त्याबरोबरच हरिंदर साहू यांनी सांगितले की, शेअर मार्केटमध्ये आधी टिकायला शिकलं पाहिजे. जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये सर्वाइव्ह कराल तेव्हा लाँग टर्मसाठी टिकून राहू शकाल. तसेच सर्वाइव्हशिवाय बाजारामध्ये दीर्घकाळ टिकून राहता येत नाही.  तसेच आपण दुसऱ्यांनी केलेल्या चुकांमधून शिकलं पाहिजे. दुसरे ज्या चुका करतात, त्या आपण करता कामा नये. तेव्हाच आपण मार्केटमधून नफा कमवू शकू आणि नुकसानही कमी करू शकू.

असे स्टॉक टाळा
हरिंदर साहू यांनी सांगितले की, बाजारामध्ये जो स्टॉक नॉन स्टॉप पळत आहेत, त्यांना नेहमी विकण्याचा विचार करा. त्या स्टॉकमधून बाहेर पडा. तसेच जर कुठला स्टॉक नॉन स्टॉप पडत असेल, तर त्यामागचं कारण जाणून घ्या. जर त्या स्टॉक पडण्यामागे कुठलं कारण असेल, तर त्यामागचं कारण जाणून घ्या. जर त्या स्टॉकच्या पडण्यामागे कुठलं मोठं कारण नसेल तर त्यामध्ये गुंतवणूक केली जाऊ शकते. तसेच लाँग टर्म साईड इन्कम तयार केली जाऊ शकते. 

(टीप - कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Web Title: Stock Market: What to do to reduce losses in the stock market? This will increase the side income

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.