Join us

शनिवारी सुरू राहणार शेअर बाजार, सुट्टीच्या दिवशीही ट्रेडिंग करता येणार; NSE नं दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 10:49 AM

शेअर बाजारांमध्ये सहसा शनिवार आणि रविवारी किंवा सुट्टयांच्या दिवशी व्यवहार केला जात नाही. परंतु शनिवारी विशेष सत्र भरवण्यात येणार आहे.

Stock Market News: शेअर बाजारांमध्ये सहसा शनिवार आणि रविवारी किंवा सुट्टयांच्या दिवशी व्यवहार केला जात नाही. म्हणजेच या दिवशी शेअर्सची खरेदी-विक्री होत नाही. शेअर बाजारात सोमवार ते शुक्रवार काम या दिवसांतच ट्रेडिंग होतं. परंतु नॅशनल स्टॉक एक्सचेंजनं आता २ मार्च रोजी शेअर बाजार उघडणार असून ट्रेडिंग होणार असल्याची माहिती दिली.  

याचा अर्थ असा आहे की तुम्ही शनिवार, २ मार्च रोजी देखील शेअर बाजारात व्यवहार करू शकाल. यामध्ये, इंट्राडे कामकाजाला डिजास्टर रिकव्हरी साईट एक्सचेंजवर आणंलं जाईल. कामकाजावर परिणाम होऊ शकेल अशा कोणत्याही अनपेक्षित घटनेला सामोरे जाण्यासाठी एक्सचेंज तयार ठेवण्यासाठी या विशेष सत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. यापूर्वी शनिवार, २० जानेवारी रोजी एनएसई आणि बीएसईवर विशेष ट्रेडिंग सत्र पार पडलं होतं. 

काय म्हटलंय एनएसईनं? 

एनएसईनं यासंदर्भात एक परिपत्रक जारी केलं आहे. २ मार्च २०२४ रोजी इक्विटी आणि इक्विटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये प्रायमरी साईटमधून डिजास्टर रिकव्हरी साईटवर इंट्रा डे सोबत विशेष लाइव्ह ट्रेडिंग सत्र आयोजित केलं जाणार असल्याचं एनएसईनं म्हटलंय. 

ट्रेडिंग सेशन इक्विटी आणि डेरिव्हेटिव्ह दोन्ही सेगमेंटमध्ये होईल. पहिलं सेशन सकाळई ९.१५ ते १० आणि दुसरं सेशन ११.३० ते १२.३० दरम्यान असेल. या दिवशी प्री सेशन सकाळी ९ वाजता होईल आणि यानंतर ९.१५ वाजता नेहमीप्रमाणे बाजार ट्रेडिंग होईल. यानंतर डिजास्टर रिकव्हरी साईटचं प्री ओपनिंग सेशन सकाळी ११.१५ ला होईल आणि ११.२३ वाजता सामान्य कामकाज सुरू होऊन ते दुपारी १२.५० पर्यंत सुरू राहिल.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसाय