Join us

पुढील १० दिवसांत ६ दिवस शेअर मार्केट राहणार बंद, NSE-BSE मध्ये ट्रेडिंग होणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 15:46 IST

Share Market Holiday: सुट्टीच्या कॅलेंडरनुसार मुंबई शेअर बाजार (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) हे दोन्ही पुढील दहा दिवसांपैकी सहा दिवस व्यवहारासाठी बंद राहतील.

Share Market Holiday: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफमध्ये दिलासा दिल्यानंतर जगभरातील शेअर बाजारांमध्ये आज तेजी आहे. परंतु आज १० एप्रिल रोजी महावीर जयंती असल्यानं शेअर बाजार ट्रेडिंगसाठी बंद आहे. इतकंच नव्हे तर सुट्टीच्या कॅलेंडरनुसार मुंबई शेअर बाजार (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) हे दोन्ही पुढील दहा दिवसांपैकी सहा दिवस व्यवहारासाठी बंद राहतील.

बीएसई कॅलेंडरनुसार एप्रिलमध्ये २०२५ महिन्यात तीन सुट्ट्या दाखवल्या जात आहेत. महावीर जयंती (१० एप्रिल), भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (१४ एप्रिल) आणि गुड फ्रायडे (१८ एप्रिल). म्हणजेच आजच्या सुट्टीनंतर वीकेंडसह पुढील दहा पैकी सहा दिवस शेअर बाजाराचं कामकाज बंद राहणार आहे.

कधी शेअर बाजार राहणार बंद?

१२ एप्रिल - शनिवारची सुट्टी

१३ एप्रिल - रविवारची सुट्टी

१४ एप्रिल - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

१८ एप्रिल - गुड फ्रायडे

१९ एप्रिल - शनिवार

२० एप्रिल - रविवारची बंदशेअर बाजारातील अपडेट्स

आज महावीर जयंतीच्या निमित्तानं देशांतर्गत शेअर बाजार बंद असला तरी अमेरिकेपासून जपानपर्यंतचे बाजार पुन्हा चमकले आहेत. यामागचे कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ९० दिवसांची शुल्कावर घातलेली बंदी. जागतिक मंदीच्या चिंतेमुळे भारतीय शेअर बाजारातील अस्थिरता अलीकडे वाढली आहे. बुधवारी झालेल्या अस्थिरतेदरम्यान बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी ५० घसरणीसह बंद झाले होते.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजार