Lokmat Money >शेअर बाजार > शेअर बाजारात पुन्हा तेजी, जबरदस्त वाढीसह बंद झाले सेन्सेक्स-निफ्टी; रियल इस्टेट शेअर्समध्ये मोठी खरेदी

शेअर बाजारात पुन्हा तेजी, जबरदस्त वाढीसह बंद झाले सेन्सेक्स-निफ्टी; रियल इस्टेट शेअर्समध्ये मोठी खरेदी

दोन दिवसांच्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजारात गुरुवारी पुन्हा तेजी दिसून आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 04:24 PM2024-01-04T16:24:34+5:302024-01-04T16:25:10+5:30

दोन दिवसांच्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजारात गुरुवारी पुन्हा तेजी दिसून आली.

Stock markets bullish again Sensex Nifty closes with tremendous gains Big buy in real estate shares | शेअर बाजारात पुन्हा तेजी, जबरदस्त वाढीसह बंद झाले सेन्सेक्स-निफ्टी; रियल इस्टेट शेअर्समध्ये मोठी खरेदी

शेअर बाजारात पुन्हा तेजी, जबरदस्त वाढीसह बंद झाले सेन्सेक्स-निफ्टी; रियल इस्टेट शेअर्समध्ये मोठी खरेदी

Stock Market Closing On 4 January 2024: दोन दिवसांच्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजारात गुरुवारी पुन्हा तेजी दिसून आली. बँकिंग, एनर्जी, एफएमसीजी आणि मिड कॅप तसंच स्मॉल कॅप शेअर्समध्ये गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. बीएसई सेन्सेक्स 491 अंकांच्या वाढीसह 71,847 च्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 151 अंकांच्या वाढीसह 21668 च्या पातळीवर बंद झाला. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार शेअर बाजारातील सध्याची तेजी पाहता तुम्ही सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे आणि तुमचा नफा सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही शेअर बाजारातून नफा कमविण्यावर भर दिला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे.

गुरुवारी, निफ्टी मिडकॅप 100 निर्देशांक 1.59 टक्क्यांनी तर बीएसई स्मॉल कॅप एक टक्क्यांहून अधिक वाढला. निफ्टी आयटीमध्येही किंचित वाढ झाली तर निफ्टी बँक सुमारे एक टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. शेअर बाजारात सर्वाधिक वाढ झालेल्या शेअर्समध्ये बजाज फायनान्स, टाटा कंझ्युमर, एनटीपीसी आणि ओएनजीसीचे शेअर्स होते, तर सर्वाधिक नुकसान झालेल्यांमध्ये बीपीसीएल, एलटीआय माइंडट्री, डॉ रेड्डीज लॅब्स आणि एचसीएल टेक यांचा समावेश होता.

गुरुवारी शेअर बाजारात मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या शेअर्समध्ये फेडरल बँक, ला ओपाला, कोरोमंडल इंटरनॅशनल, महिंद्रा हॉलिडेज, सीएमएस इन्फो सिस्टीम आणि अशोक लेलँड यांचा समावेश होता. तर पिडीलाइट, जेन्सॉल इंजिनिअरिंग, युनिफॉर्म इंडिया, आयएसएमटी लिमिटेड, फिनोलेक्स केबल. होम फर्स्ट फायनान्स आणि गेटवे डिस्ट्रिक्ट पार्कच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

अदानींच्या ५ कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी
गुरुवारी कामकाजाच्या अखेरिस गौतम अदानी समूहाच्या नऊ लिस्टेड कंपन्यांपैकी ५ कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली. एनडीटीव्ही, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी एनर्जी सोल्युशन्सचे शेअर्स किंचित घसरुन बंद झाले.

Web Title: Stock markets bullish again Sensex Nifty closes with tremendous gains Big buy in real estate shares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.