Join us

Share Market Today : घसरणीच्या सत्रांनंतर अखेर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स-निफ्टी वधारला; मिडकॅप-स्मॉलकॅप मध्ये खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 10:02 AM

Share Market Opening : भारतीय शेअर बाजार गुरुवार १४ नोव्हेंबर रोजी तेजीसह उघडला आहे. बीएसई सेन्सेक्स १२३ अंकांच्या वाढीसह ७७,८१३ अंकांवर उघडला.

Share Market Opening : भारतीय शेअर बाजार गुरुवार १४ नोव्हेंबर रोजी तेजीसह उघडला आहे. बीएसई सेन्सेक्स १२३ अंकांच्या वाढीसह ७७,८१३ अंकांवर उघडला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४० अंकांच्या वाढीसह २३५९९ अंकांवर उघडला. गेल्या अनेक दिवसांपासून शेअर बाजारात मोठी घसरण दिसून येत होती. आजच्या व्यवहारात मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे.

या शेअर्समध्ये तेजी / घसरण

आजच्या व्यवहारात सेन्सेक्सच्या ३० पैकी १७ शेअर्स वधारले, तर १३ शेअर्समध्ये घसरण दिसून आली. एचसीएल टेक १.५७ टक्के, एनटीपीसी ०.७२ टक्के, रिलायन्स ०.५६ टक्के, एशियन पेंट्स ०.५५ टक्के, एचडीएफसी बँक ०.४२ टक्के, एसबीआय ०.४८ टक्के, टेक महिंद्रा ०.३९ टक्के, इन्फोसिस ०.३१ टक्के, अॅक्सिस बँक ०.२९ टक्के, बजाज फायनान्स ०.२४ टक्क्यांनी वधारले. 

अल्ट्राटेक सिमेंट २.०८ टक्के, पॉवर ग्रिड १.५७ टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा १.२५ टक्के, एचयूएल १.१२ टक्के, मारुती ०.७६ टक्क्यांनी घसरले आहेत. आजच्या व्यवहारात बँकिंग, आयटी, ऑटो, मेटल्स, रिअल इस्टेट, एनर्जी, ऑईल अँड गॅस क्षेत्रातील शेअर्समध्ये खरेदी दिसून येत आहे. केवळ एफएमसीजी आणि हेल्थकेअर शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.

३ दिवसांत १५ लाख कोटींचे नुकसान

भारतीय शेअर बाजाराचं मार्केट कॅप १२ जून २०२४ च्या पातळीवर आलं आहे. म्हणजेच या काळात गुंतवणूकदारांनी कमावलेली सर्व कमाई परदेशी गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे झालेल्या घसरणीत बुडाली. बीएसईवर लिस्टेड शेअर्सचे बाजार भांडवल ४३०.६१ लाख कोटी रुपयांवर उघडलं, जे मागील सत्रात ४२९.४६ लाख कोटी रुपये होते. गेल्या तीन दिवसांत गुंतवणूकदारांचे १५ लाख कोटी रुपयांचे नुकसान झालं आहे.

टॅग्स :शेअर बाजार