जागतिक बाजारातील संकेतांचा परिणाम गुरुवारी देशांतर्गत शेअर बाजारावरही दिसून आला. सेन्सेक्स 610 अंकांनी घसरला आणि निफ्टी 19,530 च्या खाली बंद झाला. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे, सरकारी मालकीची तेल कंपनी ऑइल इंडियाचे शेअर्स 2 टक्क्यांनी वाढले, तर कर विभागाकडून कारणे दाखवा नोटीस मिळाल्यानंतर विमा कंपनी आयसीआयसीआय लुम्बार्डच्या (ICICI Lombard) शेअर्समध्ये घसरण झाली. त्याच वेळी, ओमॅक्स लिमिटेडचे शेअर्स 7.18 टक्क्यांनी घसरले आणि इंडियन ओव्हरसीज बँकेच्या शेअर्समध्ये 3 टक्क्यांनी वाढ झाली.वाढत्या व्याजदराच्या भीतीमुळे आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे गुरुवारी जागतिक शेअर बाजारांमध्ये घसरण दिसून आली. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला आणि सुरुवातीच्या वाढीनंतरही सेन्सेक्स आणि निफ्टी घसरुन बंद झाले. बीएसई सेन्सेक्स 610.37 अंकांनी किंवा 0.78 टक्क्यांनी घसरून 65,508.32 वर बंद झाला. NSE निफ्टी 192.90 अंकांनी किंवा 0.98 टक्क्यांच्या च्या घसरणीनंतर 19,523.55 च्या पातळीवर बंद झाला.या शेअर्समध्ये घसरणटेक महिंद्राचे शेअर्स 4.22 टक्क्यांनी घसरले. त्याचप्रमाणे एशियन पेंटचे शेअर्स 3.66 टक्के आणि विप्रो 2.17 टक्क्यांनी घसरले. त्याच वेळी लार्सन टुब्रो 2.14 टक्क्यांनी वाढून बंद झाला. भारती एअरटेल, पॉवरग्रिड, अॅक्सिस बँक, एनटीपीसी आणि एसबीआयच्या शेअर्समध्ये किंचित वाढ नोंदवण्यात आली.एस्क्वायर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्सचे मुख्य कार्यकारी सम्राट दासगुप्ता म्हणाले की, सुधारणेनंतरही भारतानं जागतिक बाजारपेठांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. परंतु, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि रुपयाची घसरण यासारखे अनेक धोकेही दिसत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला फेडरल रिझर्व्हने कठोर भूमिका घेतल्यानंतर यूएस ट्रेझरी उत्पन्नात वाढ झाल्यामुळं आणि डॉलरमधील व्याजदर दीर्घ कालावधीसाठी उच्च राहतील या भीतीमुळे जागतिक इक्विटी मार्केटवर परिणाम होत आहे.
शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्समध्ये ६१० अंकांची घसरण; निफ्टी १९५३० च्या खाली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 4:31 PM