Join us  

Stock Price UP : घसरत्या बाजारातही 'या' शेअर्समध्ये आहे तुफान तेजी, गुंतवणूकदार सुखावले, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 1:49 PM

निफ्टी मिड आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये घसरण होत असताना काही शेअर्स असे आहेत ज्यांनी आज आपल्या गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर हसू आणलंय आणि त्यांना मोठा नफाही मिळवून दिलाय.

आज शेअर बाजारात मोठी घसरण दिसून येत आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री दिसून येतेय. निफ्टी मिड आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये घसरण होत असताना काही शेअर्स असे आहेत ज्यांनी आज आपल्या गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर हसू आणलंय आणि त्यांना मोठा नफाही मिळवून दिलाय.

राजेश एक्सपोर्टमध्ये १३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. सकाळी साडेअकराच्या सुमारास हा शेअर सुमारे ३२४ रुपयांवर व्यवहार करत होता. रेल्वे शेअर रेल विकास निगममध्येही ९ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. आज हा शेअर ५९० रुपयांच्या जवळपास ट्रेड करत होता. सीएएमएसही ५ टक्क्यांच्या वर ट्रेड करत होता. कामकाजादरम्यान शेअर ४१८९ रुपयांच्या जवळपास ट्रेड करत होता. वर्धमान टेक्सटाइलमध्येही ५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली होती. तर दुसरीकडे इंडिगो पेंट्सचे शेअर्स सुमारे साडेपाच टक्क्यांनी वधारले.

या शेअर्समध्ये मोठी घसरण

आज कामकाजादरम्यान महिंद्रा अँड महिंद्राचा शेअर सुमारे साडेसहा टक्क्यांनी घसरला होता. हा शेअर २७३८ च्या ट्रेड करत होता. दीपक फर्टिलायझर्समध्ये ५ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. तर आयईईमध्येही ५.२२ टक्क्यांची घसरण झाली आहे. फॅक्ट, ब्लू स्टार, राष्ट्रीय केमिकल्स, हिंद कॉपर आदी शेअर्स ४ टक्क्यांहून अधिक घसरणीसह ट्रेड करत होते.

जागतिक बाजारातील कमकुवत कलांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात नवीन विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक घसरले. कामकाजाच्या सुरुवातीला बीएसईचा ३० शेअर्सचा निर्देशांक १२९.७२ अंकांनी वधारून ८०,४८१.३६ अंकांवर पोहोचला होता.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक