Lokmat Money >शेअर बाजार > Stock Market Crash : संकटात संधी! बाजार आपटल्यानंतरही गुंतणवूकदार नफ्यात; या शेअर्समध्ये २०% अप्पर सर्किट

Stock Market Crash : संकटात संधी! बाजार आपटल्यानंतरही गुंतणवूकदार नफ्यात; या शेअर्समध्ये २०% अप्पर सर्किट

Stocks in upper circuit today : भारतीय शेअर बाजारात आज कमालीची घसरण झाली आहे. असे असतानाही काही शेअर्सनी चांगली कामगिरी केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 04:32 PM2024-10-03T16:32:04+5:302024-10-03T16:32:57+5:30

Stocks in upper circuit today : भारतीय शेअर बाजारात आज कमालीची घसरण झाली आहे. असे असतानाही काही शेअर्सनी चांगली कामगिरी केली आहे.

stocks in upper circuit today despite share market crash | Stock Market Crash : संकटात संधी! बाजार आपटल्यानंतरही गुंतणवूकदार नफ्यात; या शेअर्समध्ये २०% अप्पर सर्किट

Stock Market Crash : संकटात संधी! बाजार आपटल्यानंतरही गुंतणवूकदार नफ्यात; या शेअर्समध्ये २०% अप्पर सर्किट

Stocks in upper circuit : इराण आणि इस्रायल संघर्षाची भारतीय शेअर बाजारलाही झळ पोहचली. शेअर बाजार जवळपास १८०० अंकांनी घसरला. यामध्ये गुंतवणूकदारांचे १० कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान झालं. महिन्याभरात कमावलेला नफा बाजारातील एका सत्रात संपला आहे. सेन्सेक्स पॅकमध्ये सर्वात मोठी घसरण एशियन पेंट, लार्सन अँड टुब्रो, मारुती, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, रिलायन्स, ॲक्सिस बँक आणि टाटा मोटर्समध्ये दिसून आली. अशा परिस्थितीतही काही शेअर्सने जोरदार कामगिरी केली आहे. या शेअर्समध्ये २० टक्के अप्पर सर्किट लागला.

बाजार का पडला?
आज शेअर बाजाराच्या या घसरणीमागे अनेक कारणे आहेत. यामध्ये इराण आणि इस्रायलमधील वाढता तणाव, कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ, सेबीने फ्युचर्स आणि ऑप्शन्ससाठी आणलेले नवे नियम, परदेशी गुंतवणूकदारांची विक्री आणि परकीय गुंतवणूकदारांचा चिनी बाजाराकडे कल यांचा समावेश आहे. जेफरीजच्या ख्रिस वुडने भारतातील वेटेज १% कमी करुन चीनमध्ये २% वाढवले ​​आहे. गेल्या आठवड्यात चिनी सरकारने अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी व्याजदर कपातीचा निर्णय घेतला होता.

या शेअर्सला लागला अप्पर सर्किट
Reliance Power
रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये ५ टक्के अपर सर्किट लागलं आहे. शेअरची किंमत ५३.६५ रुपयांपर्यंत वाढली आहे.

The Grob Tea
द ग्रोब टी लिमिटेडचे ​​शेअर्सही आज २० टक्क्यांच्या वरच्या सर्किटवर पोहोचले. शेअरची किंमत १२७३.६० रुपयांपर्यंत वाढली आहे.

Asian Hotels
एशियन हॉटेल (नॉर्थ) लिमिटेडचे ​​शेअर्स ५ टक्क्यांच्या अप्पर सर्किटवर पोहोचले. शेअरची किंमत २१७.०४ रुपये झाली आहे.

Ravindra Energy
रवींद्र एनर्जीच्या शेअर्समध्ये ५ टक्के अपर सर्किट असून शेअरची किंमत १३८.७० रुपयांपर्यंत वाढली आहे.

Surana Solar
सुराणा सोलरच्या शेअर्समध्ये ५ टक्के अपर सर्किट लागलं आहे. या शेअरची किंमत ६५.३९ रुपये झाली आहे.

Sejal Glass
सेजल ग्लासच्या शेअर्समध्ये ५ टक्के अपर सर्किट आहे. शेअरची किंमत ४३५.३५ रुपये झाली आहे.

Eurotex
युरोटेक्सच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांचा अप्पर सर्किट लागला. त्यामुळे शेअरची किंमत १७.९८ रुपये झाली आहे.

Taylormade Rene
या शेअरमध्ये १० टक्के अपर सर्किट आहे. त्यामुळे शेअरचा भाव ४४७.५५ रुपयांपर्यंत वाढला आहे.

Sadbhav Engg
या शेअरमध्ये ५ टक्क्यांची अप्पर सर्किट आहे. त्यामुळे शेअरची किंमत ३६.६ रुपये झाली आहे.

Alacrity Sec
या शेअरमध्ये ५ टक्क्यांचा अप्पर सर्किट लागला आहे. यामुळे शेअरची किंमत १४३.३५ रुपये झाली आहे.

Web Title: stocks in upper circuit today despite share market crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.