देशात शेअर बाजारात अनेक गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स सक्रिय आहेत. जसे आपण म्युच्युअल फंडामध्ये एकरकमी किंवा प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम (एसआयपी) करतो, तसंच थेट शेअर्समध्येही एसआयपीचा पर्याय उपलब्ध असतो. आपल्याला जर हे माहीत नसेल तर माहीत करुन घ्या.
...अशी सुरू करा एसआयपी
1. सर्वप्रथम अधिकृत ब्रोकरकडून डिमॅट अकाऊंट सुरु करा. प्रत्येक महिन्याला आपणास जितकी रक्कम बाजूला काढता येईल याचा विचार करा.
2. शेअर बाजारात अनेक उत्तम शेअर्स उपलब्ध आहेत. यातील चांगल्या कंपन्यांचे काही शेअर्स निवडा, शेअर निवडताना आपले बजेट आणि शेअरची किंमत याचा ताळमेळ जमवा.
3. डिमॅट अकाउंटमध्ये स्टॉक एसआयपी या ऑप्शनमध्ये जाऊन त्यात निवडलेले शेअर्स लिस्ट करा. एसआयपी सुरू करून प्रत्येक महिन्याची तारीख निश्चित करून घ्या आणि किती शेअर्स खरेदी करायचे तेही ठरवून घ्या.
4. डिमॅट खात्यात आवश्यक रक्कम प्रत्येक महिन्यात जमा करून ठेवा. आपण निश्चित केलेल्या तारखेला शेअर खरेदी केला जाईल.
5. स्टॉक एसआयपीचा फायदा म्युच्युअल फंडप्रमाणेच होतो. प्रत्येक महिन्याला कमी- अधिक जो भाव असेल त्यानुसार शेअर्स मिळत जातात. एकूण किंमत सरासरी होत जाते. दीर्घ काळात शेअरचा भाव वाढत गेला तर त्याचा उत्तम फायदा होत जातो. स्टॉक एसआयपी करताना त्याचा कालावधी दीर्घकाळ असल्यास फायदा अधिक प्रमाणात होतो.
(यामध्ये सामान्य माहीती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)