Join us

Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 3:37 PM

Storage Technologies and Automation IPO: कंपनीचा शेअर बुधवारी ९० टक्क्यांच्या प्रीमिअमसह १४८.२० रुपयांवर लिस्ट झाला. आयपीओमध्ये शेअरची किंमत ७८ रुपये होती.

स्टोरेज टेक्नॉलॉजीज अँड ऑटोमेशन लिमिटेडच्या (Storage Technologies and Automation) शेअर्सची बाजारात जबरदस्त एन्ट्री झाली. स्टोरेज टेक्नॉलॉजीज अँड ऑटोमेशनचा शेअर बुधवारी ९० टक्क्यांच्या प्रीमिअमसह १४८.२० रुपयांवर लिस्ट झाला. आयपीओमध्ये स्टोरेज टेक्नॉलॉजीजच्या शेअरची किंमत ७८ रुपये होती. छोट्या कंपनीचा आयपीओ ३० एप्रिल २०२४ रोजी सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला आणि ३ मे पर्यंत खुला राहिला. स्टोरेज टेक्नॉलॉजीज अँड ऑटोमेशन ऑक्टोबर २०१० मध्ये सुरू झाली. ही कंपनी स्टोरेज रॅकिंग सिस्टीमच्या व्यवसायात आहे. 

लिस्टिंगनंतर मोठी तेजी 

जबरदस्त लिस्टिंगनंतर स्टोरेज टेक्नॉलॉजीज अँड ऑटोमेशनचे शेअर्स (Storage Technologies and Automation) ५ टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह १५५.५९ रुपयांवर पोहोचले. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत ७८ रुपये होती. स्टोरेज टेक्नॉलॉजीजच्या शेअर्सने पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. कंपनीचा एकूण पब्लिक इश्यू साइज २९.९५ कोटी रुपये होता. मुंबई शेअर बाजाराच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर स्टोरेज टेक्नॉलॉजीज आणि ऑटोमेशनचे शेअर्स लिस्ट आहेत. आयपीओपूर्वी कंपनीत प्रवर्तकांचा हिस्सा १०० टक्के होता, तो आता ७०.०९ टक्के झाला आहे. 

२७८ पटींपेक्षा अधिक सबस्क्राईब 

स्टोरेज टेक्नॉलॉजीज अँड ऑटोमेशनचा आयपीओ २७८.८२ पट सब्सक्राइब झाला. आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा २४२.७४ पट सब्सक्राइब झाला होता. तर आयपीओमध्ये नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सचा (NII) कोटा ५७७.०२ पट, क्वालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्सचा (QIB) कोटा ११७.८६ पट सब्सक्राइब झाला. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना केवळ १ लॉटसाठी बोली लावता आली. आयपीओमध्ये एका लॉटमध्ये १६०० शेअर्स होते. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना कंपनीच्या आयपीओमध्ये १२४८०० रुपयांची गुंतवणूक करावी लागली. तर, कंपनीच्या आयपीओमध्ये हाय नेटवर्थ इंडिविज्युअल २ लॉटसाठी बोली लावू शकणार होते. 

(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक