सिव्हिल कंस्ट्रक्शन उद्योगाशी संबंधित NBCC या सरकारी कंपनीचा शेअर गुरुवारी 8 टक्क्यांहून अधिकच्या तेजीसह 69.80 रुपयांवर पोहोचला. विशेष म्हणजे, कंपनीच्या शेअरने गुरुवारी 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे. याच बरोबर NBCC चा शेअर 5 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. सरकारी कंपनी NBCC चा शेअर बुधवारी 64.63 रुपयांवर बंद झाला होता. या शेअरचा 52 आठवड्यांतील निचांक 30.96 रुपये एवढा आहे.
4 महिन्यांत 80 टक्क्यांची तेजी -
एनबीसीसीच्या शेअर्समध्ये गेल्या 4 महिन्यांत चांगली तेजी दिसून आली आहे. कंपनीचा शेअर 28 जून 2023 रोजी 38.51 रुपयांवर होता. तो 19 ऑक्टोबर 2023 रोजी 69.80 रुपयांवर पोहोचला. या शेअरने गेल्या 4 महिन्यांत 80 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. तसेच, गेल्या एका वर्षाचा विचार करता, एनबीसीसीच्या शेअर्सनी 113 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. कंपनीचा शेअर 19 ऑक्टोबर 2022 रोजी 32.65 रुपयांवर होता. तो 19 ऑक्टोबर 2023 रोजी 69.80 रुपयांवर पोहोचाला.
कंपनीला सातत्याने मिळतायत ऑर्डर्स -
एनबीसीसीला सातत्याने ऑर्डर्स मिळत आहेत. विशाखापट्टनम पोर्ट अथॉरिटीकडून कंपनीला नुकतीच ऑफिस बिल्डिंगच्या नूतनीकरणासाठी 80 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. याशिवाय, कंपनीला खादी अँड व्हिलेज इंडस्ट्रीज कमीशनकडूनही 150 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. तसेच, स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाकडूनही (SAIL) कंपनीला 180 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. एनबीसीसीचे मार्केट कॅप 12430 कोटी रुपयांहूनही अधिक आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)