Join us  

अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशी शेअर बाजारात जोरदार विक्री; Sensex-Nifty आपटले, ₹२.३४ लाख कोटी बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 9:47 AM

Stock Market News: जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारातही विक्रीचा दबाव दिसून येत आहे. बाजार उघडताच निफ्टी २४४०० आणि सेन्सेक्स ८०१०० वर आला. 

Stock Market News: जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत बाजारातही विक्रीचा दबाव दिसून येत आहे. चालू आर्थिक वर्ष 2024-25 चा अर्थसंकल्प सादर होण्याच्या एक दिवस आधी देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण दिसून आली. बाजार उघडताच निफ्टी २४४०० आणि सेन्सेक्स ८०१०० वर आला. 

एफएमएसजी वगळता निफ्टी क्षेत्रातील सर्व निर्देशांक रेड झोनमध्ये ट्रेड करत होते. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही विक्रीचा दबाव आहे. एकंदरीत बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप २.३४ लाख कोटी रुपयांनी घसरलं आहे, म्हणजेच बाजार उघडताच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत २.३४ लाख कोटी रुपयांची घट झाली.

आता इक्विटी बेंचमार्क निर्देशांकांबद्दल बोलायचं झालं तर बीएसई सेन्सेक्स सध्या ४५०.५२ अंकांनी म्हणजेच ०.५६ टक्क्यांनी घसरून ८०,१५४.१३ वर आणि निफ्टी ५० हा १५२.०५ अंकांनी म्हणजेच ०.६२ टक्क्यांनी घसरून २४,३७८.८५ वर ट्रेड करत होता. एक दिवसापूर्वी सेन्सेक्स ८०,६०४.६५ वर आणि निफ्टी २४,५३०.९० वर बंद झाला होता.

आयटीसी, एचडीएफसी वधारले

सेन्सेक्समध्ये ३० शेअर्स लिस्टेड असून त्यापैकी १० शेअर्स ग्रीन झोनमध्ये आहेत. नेस्ले, आयटीसी आणि एचडीएफसी बँकेच्या शेअर्समध्ये मोठी तेजी दिसून आली. दुसरीकडे रिलायन्स, कोटक बँक आणि जेएसडब्ल्यू स्टीलचे शेअर्स सर्वाधिक घसरले. याशिवाय नेस्ले, हिंदुस्तान युनिलिव्हर, एनटीपीसी, टीसीएस, सन फार्मा, एअरटेल या कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी दिसून आली.

टॅग्स :शेअर बाजार