Lokmat Money >शेअर बाजार > 8 रुपयांच्या शेअरनं कमाल केली, गुंतवणूकदार झाले करोडपती! दिला 23000 टक्क्यांचा बम्पर परतावा

8 रुपयांच्या शेअरनं कमाल केली, गुंतवणूकदार झाले करोडपती! दिला 23000 टक्क्यांचा बम्पर परतावा

शुक्रवारी कंपनीचा शेअर 0.95 टक्क्यांनी वाढून 1904.85 रुपयांवर पोहोचला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2023 11:21 PM2023-09-09T23:21:42+5:302023-09-09T23:22:16+5:30

शुक्रवारी कंपनीचा शेअर 0.95 टक्क्यांनी वाढून 1904.85 रुपयांवर पोहोचला.

stylam industries ltd rs 8 share Delivered a bumper return of 23000 percent investors became millionaires | 8 रुपयांच्या शेअरनं कमाल केली, गुंतवणूकदार झाले करोडपती! दिला 23000 टक्क्यांचा बम्पर परतावा

8 रुपयांच्या शेअरनं कमाल केली, गुंतवणूकदार झाले करोडपती! दिला 23000 टक्क्यांचा बम्पर परतावा

स्टाइलम इंडस्ट्रीज लिमिटेडच्या (Stylam Industries Ltd) शेअरमध्ये गेल्या काही वर्षांत जबरदस्त वृद्धी दिसून आली आहे. शुक्रवारी कंपनीचा शेअर 0.95 टक्क्यांनी वाढून 1904.85 रुपयांवर पोहोचला. गेल्या 11 वर्षात या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 23000 टक्क्यांहून अधिकचा परतावा देऊन करोडपती बनवले आहे.

जानेवारी 2012 मध्ये Stylam Industries Ltd च्या एका शेअरची किंमत 8.13 रुपये होती. तेव्हा 1 लाख रुपयांचे शेअर खरीदने करणाऱ्या गुंतवणूकदाराने ते आतापर्यंत होल्ड करून  ठेवले असतील, तर आता त्याच्या शेअरचे मूल्य 2.34 कोटी रुपये झाले असते. अर्थात या 11 वर्षांत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना बम्पर परतावा दिला आहे. Stylam Industries Ltd चे मार्केट कॅप 3228 कोटी रुपये आहे.

जून तिमाहीत कंपनीचा नफा 225 कोटी रुपये होता. तर गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनी का नफा 234 कोटी रुपये होता. अर्थात वार्षिक आधारावर कंपनीच्या निव्वळ नफ्यात 4 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. या कंपनीत प्रमोटर्सचा वाटा 54.61 टक्के एवढा आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: stylam industries ltd rs 8 share Delivered a bumper return of 23000 percent investors became millionaires

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.