Join us

Sula Vineyards IPO : वाईन तयार करणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या कंपनीचा येणार IPO, गुंतवणूकदारांना कमाईची संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2022 12:51 PM

Sula Vineyards IPO : सुलाचा पब्लिक इश्यू पूर्णपणे ऑफर फॉर सेल असेल. त्याचे इक्विटी शेअर्स बीएसई आणि एनएसईवर लिस्ट करण्याचा प्रस्ताव आहे.

Sula Vineyards IPO : भारतातील सर्वात मोठी वाइन उत्पादक सुला वाईनयार्ड्सला IPO द्वारे निधी उभारण्यासाठी SEBI ची मान्यता मिळाली आहे. सुलाचा पब्लिक इश्यू पूर्णपणे ऑफर फॉर सेल असेल. सुला वाईनयार्ड्सने या वर्षी जुलैमध्ये ड्राफ्ट प्रॉस्पेक्टस दाखल केला. कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी सुला विनयार्ड्स IPO साठी समन्वयक लीड मॅनेजर आहे. IPO नंतर, BSE आणि NSE वर इक्विटी शेअर्स लिस्ट करण्याचा प्रस्ताव आहे. कंपनीला 3 नोव्हेंबर रोजी ऑब्झर्व्हेशन लेटर मिळालं होतं. तसंच कंपनीनं 18 जुलै रोजी सेबीकडे ड्राफ्ट जमा केला होता.

हे आहेत लीड मॅनेजर्सOFS अंतर्गत ऑफर केल्या जाणार्‍या इक्विटी शेअर्सची फेस व्हॅल्यू 2 रुपये प्रति इक्विटी शेअर निश्चित करण्यात आली आहे. कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, CLSA इंडिया आणि IIFL सिक्युरिटीज सारख्या कंपन्या IPO साठी बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत. तर KFin Technologies ऑफरचे रजिस्ट्रार आहेत.

पहिली वाईन कंपनी होणार लिस्टसुला वाईनयार्ड्स स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट होणारी पहिली वाइन तयार करणारी कंपनी असेल. त्याच वेळी, अल्कोहोल आणि स्पिरिट्स विभागात आयपीओ आणणारी ही दुसरी कंपनी असेल. ऑफिसर्स चॉईस व्हिस्कीचं उत्पादन करणाऱ्या अलाईड ब्लेंडर्स अँड डिस्टिलर्सनेही या वर्षी आयपीओसाठी सेबीकडे कागदपत्रे सादर केली आहेत.

सुला आहे मार्केट लीडरसुला ही आर्थिक वर्ष 2009 पासूनच सेल्स व्हॉल्युम आणि व्हॅल्यूच्या दृष्टीने भारतीय वाईन इंडस्ट्रीमधील सर्वात मोठी वाईन उत्पादक, विक्रेता आणि मार्केट लीडर आहे. कंपनीनं 1996 मध्ये आपलं पहिलं वाईनयार्ड तयार केलं होतं आणि पाच वर्षांपेक्षाही कमी कालावधीत वाईन सादर करणारी कंपनी ठरली होती. कंपनीनं Sauvignon Blanc, Chenin Blanc, Zinfandel, Riesling, Red Sparkling असे अनेक ब्रँड्स सादर केले आहेत.

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगगुंतवणूक