Lokmat Money >शेअर बाजार > ५० पेक्षा अधिक वेळा कंपनीनं दिलाय डिविडेंड, आता पुन्हा एकदा केली घोषणा; वर्षभरात शेअरमध्ये दुप्पट वाढ

५० पेक्षा अधिक वेळा कंपनीनं दिलाय डिविडेंड, आता पुन्हा एकदा केली घोषणा; वर्षभरात शेअरमध्ये दुप्पट वाढ

डिविडेंड देणाऱ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक गुड न्यूज आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 02:08 PM2024-03-29T14:08:16+5:302024-03-29T14:08:42+5:30

डिविडेंड देणाऱ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक गुड न्यूज आहे.

Sun Tv Network Ltd given dividend more than 50 times now announced once again Shares doubled in a year share market | ५० पेक्षा अधिक वेळा कंपनीनं दिलाय डिविडेंड, आता पुन्हा एकदा केली घोषणा; वर्षभरात शेअरमध्ये दुप्पट वाढ

५० पेक्षा अधिक वेळा कंपनीनं दिलाय डिविडेंड, आता पुन्हा एकदा केली घोषणा; वर्षभरात शेअरमध्ये दुप्पट वाढ

Dividend Stock: डिविडेंड देणाऱ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक गुड न्यूज आहे. सन टीव्ही नेटवर्क लिमिटेडनं (Sun Tv Network Ltd) डिविडेंड जाहीर केला आहे. कंपनीने गुरुवारी यासंदर्भातील घोषणा केली. गुरुवारी कंपनीच्या एका शेअरची किंमत 0.80 टक्क्यांनी वाढून 600.75 रुपयांपर्यंत पोहोचली होती. या डिविडेंड देणाऱ्या स्टॉकबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.
 

किती डिविडंड देणार कंपनी?
 

कंपनीनं स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत म्हटलंय की, पात्र गुंतवणूकदारांना 5 रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या शेअरवर 3 रुपये अंतरिम डिविडंड दिला जाईल. म्हणजेच पात्र गुंतवणूकदारांना एका शेअरवर 60 टक्के नफा मिळणार आहे. कंपनीनं डिविडंडसाठी 8 एप्रिल ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आलीये. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांचं नाव या दिवशी कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये असेल त्यांनाच या डिविडंटचा लाभ मिळेल.
 

यापूर्वी दिलाय बोनस शेअर
 

कंपनीनं 50 पेक्षा जास्त वेळा डिविडंड दिला आहे. 2007 मध्ये कंपनीने पहिल्यांदा डिविडंड दिला. तेव्हा कंपनीनं एका शेअरवर 2 रुपये डिविडंड दिला होता. त्याच वेळी, 23 फेब्रुवारी 2024 रोजी एक्स-डिविडंड स्टॉक म्हणून शेवटचा व्यवहार झाला होता. कंपनीने एकदा बोनस शेअरही दिला होता. 2007 मध्येच कंपनीने प्रत्येक शेअरवर 1 शेअर बोनस दिला होता.
 

बीएसईवर कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 734.90 रुपये आहे आणि 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 396.95 रुपये आहे. कंपनीचं मार्केट कॅप 23,674.63 कोटी रुपये आहे.
 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Sun Tv Network Ltd given dividend more than 50 times now announced once again Shares doubled in a year share market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.